शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असतानाही मुलांनी गिरवले व्यवहार ज्ञानाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:41 IST

CoronaVirusUnlock Satara- पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे, अर्थकारण समजावे यासाठी शाळांमधून दरवर्षी भाजीमंडई भरवली जाते. कोरोनाचा शिरकाव झाला अन् मार्चपासून शाळा बंद ठेवाव्या लागल्या. घरात बसून मुलं ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यांच्यातील शिक्षणाचा आनंद कमी होऊ नये म्हणून वाईतील सोसायटीमध्येच भाजीमंडई भरवण्यात आली होती.

ठळक मुद्देशाळा बंद असतानाही मुलांनी गिरवले व्यवहार ज्ञानाचे धडे!सोसायटीत भरवली भाजीमंडई : वाईमध्ये निवृत्त शिक्षकेसह उपशिक्षकेचा उपक्रम

वाई : पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे, अर्थकारण समजावे यासाठी शाळांमधून दरवर्षी भाजीमंडई भरवली जाते. कोरोनाचा शिरकाव झाला अन् मार्चपासून शाळा बंद ठेवाव्या लागल्या. घरात बसून मुलं ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यांच्यातील शिक्षणाचा आनंद कमी होऊ नये म्हणून वाईतील सोसायटीमध्येच भाजीमंडई भरवण्यात आली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये म्हणून गेली सहा महिन्यांपासून शासनाने शाळकरी मुलांना शाळा बंद ठेवल्या आहेत. बहुतांश शाळा ऑनलाईन धडे देत आहेत. त्याला ही अनेक मुले कंटाळली आहेत. कोरोनाच्या या प्रदीर्घ सुट्टीला कंटाळलेल्या बालचमूमध्ये नवचैतन्याचा झरा निर्माण करणारा भाजी मंडई हा उपक्रम कन्याशाळेच्या माजी उपशिक्षिका रुक्मिणी घोलप, केंजळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका शीला मांढरे यांच्या कल्पकतेतून हा अनोखा उपक्रम सोसायटीमध्येच साकारण्यात आला.भाजी खरेदीपासून भाजी विक्रीसाठी ठेवणे, भाजीची विक्री करणे या सर्व गोष्टींचे नियोजन बालचमूने शीला मांढरे व रुक्मिणी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सायंकाळी चार ते सातपर्यंत बालमंडई भरली होती. यावेळी साक्षीपार्क सोसायटीसह आजूबाजूच्या सोसायट्या, रहिवाशांनी खरेदीला गर्दी केली होती.लहान मुलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व एक वेगळा आनंद दिसत होता. बालमंडईमध्ये आर्यन पवार, श्रेयश राजपुरे, युवराज राजपुरे, श्रावणी शिंगटे, सिद्धार्थ कुचेकर, समृद्धी कुचेकर, अथर्व घोरपडे, अर्णव ढवळे, सत्यजित सावंत, दुर्वा मोरे, चिनू मोरे, अर्णव ढवळे या बाल विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता. भाजी मंडई सोशल डिस्टंसिंगचे पालन करत पालक ग्राहकांनी भाजी खरेदी केली. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी बालचमुना खाऊ वाटप केला.खऱ्या कमाईचा आनंदअनेक दिवस शाळा बंद असल्यामुळे न कळत यांचे वाईट परिणाम मुलांवर दिसत आहेत. त्यांना काहीतरी वेगळं शिकण्याचा आनंद मिळावा. उपक्रमामुळे मुलांना भाजीची खरेदी विक्री कशी करायची, आर्थिक व्यवहार कसा करायचा, आकडेमोड कशी करायची याचे व्यवहार ज्ञान मिळाले. तसेच खरी कमाई मिळाल्यामुळे त्यांना जो आनंद मिळाला त्याला तोड नाही, अशा भावना सामाजिक कार्यकत्या रुक्मिणी घोलप यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाSatara areaसातारा परिसर