रूग्णालयातील दीड लाख रुपयांचे बिल केले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST2021-04-20T04:40:36+5:302021-04-20T04:40:36+5:30
सातारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. २२३ रुग्णांपैकी १४ रुग्णांचे ...

रूग्णालयातील दीड लाख रुपयांचे बिल केले कमी
सातारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. २२३ रुग्णांपैकी १४ रुग्णांचे एक लाख अठ्ठावीस हजार चारशे बेचाळीस रुपये कमी करण्याबाबत ऑडिटर यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना कळविले आहे.
रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू नाही, अशा रुग्णालयांमध्ये शासकीय दरापेक्षा जास्त आकारणी केलेल्या देयकासंदर्भात कामकाज करण्याकामी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन संजय आसवले, डॉ. देविदास बागल जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, सातारा यांची नेमणूक केली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही रुग्णालयामध्ये बिलासंदर्भात काही शंका असल्यास नागरिकांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री क्र. १०७७ वर संपर्क साधून शंकाचे निरसन करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांमध्ये रुग्णांचे होणारे बिल तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या आदेशानुसार संजय आसवले उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. २१, सातारा यांच्या अधिपत्याखाली एकूण ६० हॉस्पिटलच्या तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले आहे. २२३ रुग्णांचे रुग्णालयांनी आकारण्यात आलेली बिलाची रक्कम एक कोटी पाच लाख चार हजार सातशे एकावन्न आलेली आहे. २२३ रुग्णांपैकी १४ रुग्णांचे एक लाख अठ्ठावीस हजार चारशे बेचाळीस रुपये कमी करण्याबाबत ऑडिटर यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना कळविले आहे.
संबधित उपविभागीय अधिकारी यांनी शासकीय दरापेक्षा जादा आकारणी केलेल्या बिलासंदर्भात आकारणी केलेली रक्कम रुग्णास परत करण्याकामी संबंधित रुग्णालयास कार्यवाही करण्यातबाबत कळविण्यात आले आहे.