शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; कोयनेतील विसर्ग पूर्णत: बंद

By नितीन काळेल | Updated: August 9, 2023 12:21 IST

पाणीसाठा ८३ टीएमसीवर जाईना: महाबळेश्वरला २२ मिलीमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात अत्यल्प पाऊस होत असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक चार हजार क्यूसेकपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे धरणसाठाही ८३ टीएमसीच्या वर जाईना अशी स्थिती आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाने कोयना धरणातील विसर्ग बुधवारी सकाळपासून पूर्णत: बंद केला आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरलाच २२ मिलीमीटर झाला आहे.पश्चिम भागात ४० दिवस दमदार पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोलीसह संपूर्ण कांदाटी खोऱ्याला पावसाने झोडपले. पण, चार दिवसांपासून अत्यल्प स्वरुपात पाऊस पडत आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, अजुनही पश्चिमेकडील धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखी धरणे पूर्णपणे भरलेली नाहीत. त्यामुळे ही धरणे भरण्यास यंदा उशिर लागणार आहे. कारण, अजुन काही दिवस पावसाची उघडीप राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर सध्यस्थितीत पश्चिमेकडे किरकोळ स्वरुपात पाऊस पडत आहे.बुधवारी सकाळच्या २४ तासांत कोयनानगरला अवघ्या ९ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर नवजाला १८ आणि महाबळेश्वर येथे २२ मिलीमीटर पाऊस पडला. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४४६५ मिलीमीटर झाला. तर कोयनेला ३१३३ आणि महाबळेश्वरला ४१५० मिलीमीटर पडलेला आहे. त्यातच पश्चिम भागात आणि धरणक्षेत्रातही पाऊस कमी आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक एकदम कमी झाली आहे.बुधवारी सकाळच्या सुमारास कोयनेत ३८२४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८२.६१ टीएमसी होता. मागील तीन दिवसांपासून पाणीसाठा ८२ ते ८३ टीएमसी दरम्यानच आहे. त्यातच आवक घटल्याच्या कारणाने धरण व्यवस्थापनाने सकाळी १० च्या सुमारासच पायथा वीजगृहातील दोन्ही युनीट बंद केली. यामुळे २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग बंद झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण