शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप; कोयना धरणात पाण्याची आवक घटली

By नितीन काळेल | Updated: August 8, 2023 12:36 IST

पाणीसाठा अजून ८३ टीएमसीखालीच

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू झाली असलीतरी कोयना धरणातील पाणीसाठा अजूनही ८३ टीएमसीखालीच आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून २३ टीएमसी पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरण लवकर भरु शकते. तर २४ तासांत कोयनेला अवघा १२ तर महाबळेश्वरला ५१ मिलीमीटरची नोंद झाली आहे.पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कास, बामणोली, तापोळा भागात सवा महिना दमदार पाऊस झाला. यामुळे भात लागणीच्या कामाला वेग आला. तसेच धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडीसह कोयना धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढला. त्यामुळे आज ही धरणे ७० टक्क्यांवर भरलेली आहेत. मात्र, मागील आठ दिवसांपासून पावसाचा जाेर कमी होत गेला. तर तीन दिवसांपासून उघडीप होती. यामुळे धरणातील आवक कमी झाली होती. ही धरणे लवकर भरणार का अशी चिंता होती. पण, उघडीपीनंतर आता पावसाची उघडझाप सुरू झाली आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २७ आणि महाबळेश्वरला ५१ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४४४७ मिलीमीटर पडला. तर कोयनेला ३१२४ आणि महाबळेश्वर येथे ४१२८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या तीनही ठिकाणी गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.कोयना धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ५ हजार ५४९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ८२.४६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण