शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकडून सिंचन मागणी कमी; कोयना धरणातून विसर्ग कमी केला

By नितीन काळेल | Updated: November 3, 2023 14:36 IST

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे यंदा धरण भरलेच नाही 

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठीची मागणी कमी झाल्याने काेयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यानुसार आता पायथा वीजगृहाचे एक युनीटच सुरू करुन १०५० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कमी पर्जन्यमानामुळे धरण भरले नसल्याने सध्या ८७ टीएमसीवरच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. त्यामुळे सध्यस्थितीत अनेक तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला नसलातरी पिण्यासाठी अनेक गावांना टॅंकर सुरू आहेत. यापुढेही टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच जाणार आहे. तर पावसाअभावी पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरली नाहीत. त्यातच कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, धरणक्षेत्रातच पाऊस कमी झाल्याने ९४ टीएमसीपर्यंतच पाणीसाठा झालेला. सध्या दुष्काळीस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.मागील आठवड्यात सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २७ आॅक्टोबरपासून कोयनेच्या पायथा वीजगृहाची दोन युनिट सुरू करुन २१०० क्यूसेक वेगाने सांगलीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मागील आठ दिवस सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत होते. मात्र, आता सिंचनासाठी मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोनपैकी एक युनीट बंद करण्यात आले आहे. सध्या एकाच युनीटमधून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे.

दरम्यान, यावर्षी कोयना धरण भरले नसल्याने पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे तरतुदीनुसार पाणी सोडावे लागणार आहे. परिणामी सिंचन आणि वीजनिर्मिती पाणी कोट्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

काेयनेवर तीन सिंचन योजना अवलंबून..कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये टेंभू योजना, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या पाणी योजनांचा समावेश आहे. या तिन्ही योजनांचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच टेंभू योजनेचे पाणी सातारा जिल्ह्यासाठीही मिळते. सांगली जिल्ह्यासाठी आतापर्यंत दोनवेळा पाणी सोडण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणीSangliसांगली