येणकेत बिबट्याची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:14+5:302021-02-06T05:13:14+5:30
येणके गाव व परिसरात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. वारंवार तो पाळीव जनावरांवर हल्ले करीत आहे. ...

येणकेत बिबट्याची दहशत कायम
येणके गाव व परिसरात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. वारंवार तो पाळीव जनावरांवर हल्ले करीत आहे. शेळ्यांच्या कळपावर काही दिवसांपूर्वी त्याने भरदिवसा हल्ला चढवून एका शेळीला ठार केले. नानासाहेब श्यामराव जगताप यांची ती शेळी होती. पळसी नावाच्या शिवारात भास्कर गरुड यांच्या शेतामध्ये ही घटना घडली. मधुकर काकडे हे त्याठिकाणी शेळ्या चारत असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळ्यांवर हल्ला केला. एका शेळीला ठार केले. अन्य दोन शेळ्यांना जखमी केले. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. प्रदीप गरुड, माणिक गरुड, अमोल पाटील, दत्ता कदम, अशोक शिंदे, भगवान काकडे आदी शेतकऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.