महाबळेश्वरच्या तहसील कार्यालय परिसरात बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:02+5:302021-02-06T05:16:02+5:30

महाबळेश्वर : तालुका न्यायालय व तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेअकराच्यासुमारास बिबट्या फिरतानाचे दी क्लबच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...

Leopard sighting in Mahabaleshwar tehsil office premises | महाबळेश्वरच्या तहसील कार्यालय परिसरात बिबट्याचे दर्शन

महाबळेश्वरच्या तहसील कार्यालय परिसरात बिबट्याचे दर्शन

महाबळेश्वर : तालुका न्यायालय व तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेअकराच्यासुमारास बिबट्या फिरतानाचे दी क्लबच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. ज्या भागात बिबट्या फिरताना आढळला आहे, तेथून अवघ्या पन्नास ते साठ मीटर अंतरावर महाबळेश्वर-पुणे हा राज्यमार्ग आहे. बिबट्याच्या वावरामुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

महाबळेश्वरला सदाहरित घनदाट जंगलाचा वेढा आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणावर लहान-मोठे प्राणी फिरताना दिसून येतात. अलीकडे या प्राण्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यामध्ये बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणीही आहेत. तालुका न्यायालय, तहसील कार्यालय व तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी एक बिबट्या फिरताना दिसून आला. गिरिस्थान नगर परिषद कार्यालयही याच परिसरात आहे. या बिबट्याच्या पुढील पायाला जखम झाल्याने तो चालताना लंगडत असल्याचे दिसत आहे. बिबटया तहसील कार्यालयामागील घनदाट जंगलातून अथवा हिरडा विश्रामगृहाजवळील जंगलातून शहर परिसरात आला असल्याचा अंदाज येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. याच भागातील रहदारीचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसून हा बिबट्या जखमी झाला असावा. ज्या भागात हा बिबट्या आढळला आहे, तेथून राज्यमार्ग अवघ्या साठ मीटर अंतरावर आहे. याच भागातून वाहने शहरात प्रवेश करतात व शहराबाहेर पडतात. रहदारीच्या रस्त्यावर बिबटया फिरताना आढळल्याने या भागातील नागरी वस्तीमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Leopard sighting in Mahabaleshwar tehsil office premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.