शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात एलईडी पथदिवे : नवीन राहू द्या.. आधी जुन्यांचाच उजेड पाडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:12 IST

सातारा पालिकेने शहरात नवीन एलईडी पथदिवे जरूर बसवावेत; परंतु यापूर्वी बसविण्यात आलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करून त्यांचा उजेड आधी पाडावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केली.

ठळक मुद्देनवीन राहू द्या.. आधी जुन्यांचाच उजेड पाडा !पालिकेच्या सभेत विरोधकांची मागणी, ‘एलईडी’चा ठराव बहुमताने मंजूर

सातारा : पालिकेने शहरात नवीन एलईडी पथदिवे जरूर बसवावेत; परंतु यापूर्वी बसविण्यात आलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करून त्यांचा उजेड आधी पाडावा. ज्या कंपनीला हा ठेका देण्यात आला आहे, त्या कंपनीकडून उर्वरित काम पूर्ण करून घ्यावे, यानंतरच नवीन ठराव मंजूर करावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केली. अखेर सत्ताधाऱ्यांनी या विषयावर उपस्थित केलेल्या मुद्द्यांनंतर एलईडीसह अजेंड्यावरील तिन्हीविषय बहुमताने मंजूर करण्यात आले.नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, महिला व बालकण्याण समिती सभापती अनिता घोरपडे, नियोजन व शहर विकास समिती सभापती स्नेहल नलवडे, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती संगीता आवळे यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.न्यायालयाने मूर्ती विसर्जनासाठी मंगळवार तळ्याला परवानगी दिल्याने सभागृहात पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यानंतर सभेला सुरुवात झाली. एलईडी पथदिवे बसविण्याच्या ठराव सभागृहापुढे चर्चेला आल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांनी प्रशासनालाच धारेवर धरले.

पालिकेच्या वतीने यापूर्वी शहरात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, ज्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे, त्या कंपनीने हे काम अद्याप पूर्ण केले नाही. शहरात एकूण किती एलईडी दिवे बसविण्यात आले, याची कोठेही नोंद नाही.दिवे बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत, असे अनेक प्रश्न विरोधी नगरसेवक अशोक मोने, नगरसेविकास सिद्धी पवार यांनी उपस्थित केले.नगरसेवक वसंत (अण्णा) लेवे यांनीही संबंधित कंपनीकडून प्रथम उर्वरित काम पूर्ण करून घ्यावे, यानंतर या ठरावावर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. एलईडीच्या ठरावावर सुमारे तासभर चर्चा झाली. अखेर हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. मंगळवार पेठेतील पाण्याच्या हौदाचे सुशोभीकरण करण्याचा ठरावालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर