मालाड पश्चिमेकडील बीचेस १९८ एलईडी दिव्यांनी उजळले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 08:27 PM2018-08-13T20:27:32+5:302018-08-13T20:28:15+5:30

The illuminated LED lights in Malad | मालाड पश्चिमेकडील बीचेस १९८ एलईडी दिव्यांनी उजळले

मालाड पश्चिमेकडील बीचेस १९८ एलईडी दिव्यांनी उजळले

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई :  मुंबईचे भूमिपूत्र हे कोळी बांधव असून गेली शेकडो वर्षे त्यांचे मुंबईत वास्तव्य आहेत. त्यांच्यावर पालिका प्रशासन अन्याय करत असल्याच्या त्यांच्या तक्रारी आहे . त्यामुळे त्यांच्या घरांच्या व अन्य समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा. यासाठी एक कृती आराखडा देखील तयार करावा, असे आवाहन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काल रात्री मालाड (प)येथील आक्सा येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात केले. येथील कोळी बांधवांच्या घरांच्या प्रश्नासाठी जर वेळ पडली तर कायदा तोडा, मात्र गरजेपोटी त्यांनी बांधलेल्या घरांवर पालिकेने हातोडा मारू नये असे आवाहन महापौरांनी यावेळी पालिका प्रशासनाला केले .        

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील सुमारे ४.२५ किलोमीटरच्या किनारपट्यावरील आक्सा, मनोरी, मढ सिल्वर, मार्वे, दानापाणी, एरंगळ असे येथील सर्व बीचेस एलईडी दिव्यांनी उजळले असून यावर एलईडी दिव्यांचे १९८ खांब उभे करण्यात आले आहेत. यासाठी पालिकेला २. ४० कोटी रुपये खर्च आला आहे .शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे किनारपट्टीवर उभारण्यात आालेल्या एलईडी प्रकाशझोतांचे लोकार्पण महापौरांच्या हस्ते काल रात्री करण्यात आले.त्यावेळी महापौर बोलत होते. 

जुहू किनारपट्टीवर एलईडी दिवे उभारण्यात आल्यानंतर मुंबईतील सर्व चौपाट्या अशाच प्रकारे उजळून टाकण्यांची संकल्पना पुढे आली. याचा लाभ येथील स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना होणार असल्याचे महापौर म्हणाले. येथील जीवरक्षक तसेच तटरक्षकांसाठी केबिन तसेच शौचालयांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले. .या प्रकल्पाच्या माध्यमातून ९ मिटर उंचीचे आक्सा येथे ५०, सिल्व्हर येथे ४५, दानापानी २२, एरंगळ २०, मार्वे येथे १५, मनोरी ४६ खांब येथे अत्याधुनिक एलईडी लाइटस् लावण्यात आले आहेत.  सहा चौपाट्यांवरील प्रकल्पांसाठी २ कोटी ४० लाख इतका खर्च आला आहे. या प्रकल्पांतर्गत १९८ खांब ४.२५ किमीच्या चौपाटीवर  करण्यात आले आहेत. संध्यकाळाच्या वेळेस हि चोपाटी प्रकाशात उजळलेली असल्यामुळे  पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या एलईडी दिव्यांसाठी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ४९ च्या नगरसेविका संगीता सुतार व त्यांचे पती समाजसेवक संजय सुतार यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे जाहीर कौतुक केले. 

खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितले की,आपण स्वतः नगरसेवक होतो,त्यामुळे अश्याप्रकारची कामे ही केवळ नगरसेवकच करू शकतात. त्यामुळे येथे उभारलेल्या सर्व  १९८ एलईडी दिव्यांचे श्रेय हे येथील शिवसेना नगरसेविका संगीता सुतार व मुंबई महानगर पालिकेचे आहे. येथील एलईडी दिव्यांचे श्रेय इतरांनी घेऊ नये, असा टोला त्यांनी अपत्यक्ष येथील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना लगावला. मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर १९८ एलईडी दिव्यांच्या उभे राहताना आपण पहिल्यांदाच पाहत आहोत. हा असाा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगत नगरसेविका  संगीता सुतार यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल  त्यांनी गौरवोद्गार काढले. 

यावेळी नगरसेविका संगीता सुतार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की,या चौपाट्यांवर  जीवरक्षक तसेच तटरक्षक बांधव कार्यरत आहेत.येथील नागरिकांची आणि येथे येत असलेल्या  पर्यटकांची संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असलेल्या कर्तव्यदक्ष जीवरक्षक, तटरक्षकांसाठी केबिन उभारण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्थाा करावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर शिवसेना विभाग क्रमांक २ चे विभागप्रमुख सुधाकर  सुर्वे , पी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संजय कबरे, नगरसेविका साधना माने, नगरसेविका स्टेफी किणी, भाजपा उत्तर मुंबई अध्यक्ष विनोद शेलार, उपविभागप्रमुख अनिल भोपी,  कोळी समाजाचे नेते किरण कोळी, समाजसेवक संजय सुतार, माजा नगरसेवक अजित भंडारी, गणेश भंडारी, मधुकर राऊत अशोक पटेल अनघा म्हात्रे ,उपविभागप्रमुख संतोष राणे,महिला उपविभागसंघटक गीता भंडारी,विजय भोसले शाखाप्रमुख संजय आजगावकर ,शाखा संघटक जयश्री म्हात्रे,बाबू सुतार,महेश पाटील,कृष्णा कोळी,भास्कर निळा,उपेश कोळी,अनिल त्रिंबक विभागातील नागरिक ,ग्रामस्थ, पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,

Web Title: The illuminated LED lights in Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई