गावच्या ‘कारभारी’ पदासाठी आज सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:16+5:302021-02-05T09:08:16+5:30
सातारा : जिल्ह्यातील ११ तहसील कार्यालयांच्यावतीने ग्रामपंचायत निवडणुकीची सरपंच आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. २९) घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील ...

गावच्या ‘कारभारी’ पदासाठी आज सोडत
सातारा : जिल्ह्यातील ११ तहसील कार्यालयांच्यावतीने ग्रामपंचायत निवडणुकीची सरपंच आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. २९) घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील १४९५ ग्रामपंचायतींच्या विद्यमान सदस्यांना तसेच आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. प्रत्येक गावात आता गावचा ‘कारभारी’ कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे. आरक्षण सोडतीनंतरच ग्रामपंचायतींच्या सत्तेची समीकरणे निश्चित होणार आहेत. आता सरपंचपदाच्या आरक्षणाची उत्सुकता लागलेली उत्सुकता लवकरच दूर होणार आहे.
जिल्ह्यामधील दि. १ एप्रिल २०२० ते दि. ३१ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण १४९५ ग्रामपंचायतींचे सरपंपदाचे तालुकानिहाय आरक्षण काढण्यासाठी संबंधित तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाने कोविड-१९ बाबत वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये निर्यमित करण्यात आलेली शासन अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदींचे काटकोर पालन करण्याच्या सूचना महसूल उपजिल्हाधिकारी किर्ती नलावडे यांनी दिल्या आहेत.
सरपंचांची तालुकानिहाय संख्या
सातारा १९६, कोरेगाव १४२, जावली १२५, वाई ९९, महाबळेश्वर ७७, खंडाळा ६३, फलटण १३१, माण ९५, खटाव १३३, कऱ्हाड २००, पाटण २३४ एकूण १४९५
सरपंचपदाच्या आरक्षित जागा
अनुसूचित जाती - १५४
महिला - ८१
खुला - ७३
अनुसूचित जमाती - १४
महिला-६
खुला - ६
नागरिकांचा मागास प्रवर्ग - ४०४
महिला-२०५
खुला - ११९
सर्वसाधारण प्रवर्ग - ९२३
महिला ४६३
खुला ४६०
तालुकानिहाय आरक्षणाचे चित्र
अनुसूचित जाती
सातारा : महिला ११, खुला १०
कोरेगाव : महिला ७, खुला ६
जावली : महिला ५, खुला ४
वाई : महिला ५, खुला ४
महाबळेश्वर : महिला ४, खुला ४
खंडाळा : महिला ३, खुला ३
फलटण : महिला १०, खुला ९
माण : महिला ६, खुला ६
खटाव : महिला ७, खुला ६
कºहाड : महिला १३, खुला १२
पाटण : महिला १०, खुला १०
अनुसूचित जमाती (सोडतीद्वारे)
सातारा : १, कोरेगाव १ जावळी २, वाई २, महाबळेश्वर ५, कऱ्हाड १, पाटण १
नागरिकांचा मागास प्रवर्ग
सातारा : महिला २७, खुला २६
कोरेगाव : महिला १९, खुला १९
जावली : महिला १७, खुला १७
वाई : महिला १४, खुला १३
महाबळेश्वर : महिला ११, खुला १०
खंडाळा : महिला ९, खुला ८
फलटण : महिला १८, खुला १७
माण : महिला १३, खुला १३
खटाव : महिला १८, खुला १८
कºहाड : महिला २७, खुला २७
पाटण : महिला ३२, खुला ३१
सर्वसाधारण प्रवर्ग
सातारा : महिला ६१, खुला ६०
कोरेगाव : महिला ४५, खुला ४५
जावली : महिला ४०, खुला ४०
वाई : महिला ३१, खुला ३०
महाबळेश्वर : महिला २२, खुला २२
खंडाळा : महिला २०, खुला २०
फलटण : महिला ३८, खुला ३८
माण : महिला २९, खुला २८
खटाव : महिला ४२, खुला ४२
कºहाड : महिला ६०, खुला ६०
पाटण : महिला ७५, खुला ७५
चौकट..
आरक्षण सोडत पारदर्शक : नलावडे
सरपंच आरक्षण सोडत ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे. तालुक्यातील नियोजितस्थळांवर विद्यमान आमदार, खासदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य तसेच ग्रामपंचायतींमध्ये नव्याने निवडून आलेल्या सदस्यांसमोर ही सोडत घेतली जाणार आहे. सोडतीआधी तहसीलदार सर्व प्रक्रियेबाबत माहिती देतील, त्यानंतरच सोडत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी दिली आहे.