शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
2
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
3
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
4
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
5
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
6
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
7
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
8
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
9
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
10
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
11
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
12
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
13
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
14
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
15
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
16
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
17
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
18
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
19
IND vs PAK : "पाकिस्तानला शत्रूची गरज नाही कारण ते...", वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया
20
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM

सातारा उदयनराजेंना सोडला तर शिर्डी, सोलापूर ‘रिपाइं’ला द्या - अशोक गायकवाड

By नितीन काळेल | Published: March 16, 2024 1:12 PM

..तर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो. पण, उमेदवारीत त्यांच्याच सातारच्या गादीचा अवमान झाला आहे. जर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिलीतर ‘रिपाइं’ला सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघ सोडावा. कारण महायुती आमच्यामुळे झाली असून सत्ता कशी बदलायची हेही आम्हाला माहीत आहे, असा इशारा ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला.सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी आण्णा वायदंडे, आप्पा तुपे यांच्यासह ‘रिपाइं’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे युतीची महायुती झाली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत देशात आणि राज्यातही सत्ता प्राप्त झाली. लोकसभा निवडणुकीत सातारची जागा महायुतीतील ‘रिपाइं’ला देण्यात आली. पण, गद्दारी झाली. तरीही आम्ही शांत आहे. आता २०२४ ची निवडणूक असलीतरी आम्हाला महायुतीतून बाहेर पडल्यासारखे वाटत आहे. तसेच उमेदवारीत सातारच्या गादीचा तसेच ‘रिपाइं’चाही अपमान झालेला आहे. त्यामुळे मागे हटायचं नाही, तर नेटाने लढायचं असं ठरवलंय.तरीही अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे संबंधितांनी सुधारणा करावी. कारण, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आमची एक लाखतरी मते आहेत. ही मते मिळाली नाहीतर भाजप ४०० जागांचा आकडाही पार करणार नाही. प्रसंगी आम्ही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू. याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊन आम्हाला सन्मान द्यावा, अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभा