मल्हारपेठ (जि. सातारा) : दुचाकीवरून मारूल हवेलीकडे निघालेल्या सुभाष काळे यांच्यावर बिबट्याने झेप घेऊन हल्ला केला. यामध्ये दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली.पाटणहून चोपदारवाडीमार्गे सोनाईचीवाडीकडे सुभाष श्रीरंग काळे हे दुचाकीवरून (एमएचओ बीए ६१७२) जात असताना अचानक उजव्या बाजूकडून त्यांच्यावर बिबट्याने झडप घातली. बिबट्याने पंजाने ओरबाडले, नख्यांनी जखमी केले.अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे सुभाष श्रीरंग काळे यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावर डाव्या बाजूला पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच बिबट्याने त्यांच्या कपाळ, मानेवरती हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यांच्या अंगात असणाऱ्या रेनकोटमुळे ते वाचले असल्याचे त्यांनी सांगितले.
धावत्या दुचाकीवर बिबट्याची झेप; चालक जखमी; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 17:36 IST