शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

साताऱ्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

By सचिन काकडे | Updated: August 16, 2023 16:36 IST

जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची आवक कमी

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असून, याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होऊ लागला आहे. बुधवारी सकाळी शहरातील डोंगरी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना ऐन पावसात टंचाईचा सामना करावा लागला.कास योजनेच्या जलवाहिनीला आटाळी व कासाणी गावाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या गळतीमुळे सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असून, पाणीवितरण व्यवस्थेचा महत्वाचा दुवा असलेल्या पाण्याच्या टाक्या देखील पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. परिणामी शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्ण विस्कळीत झाला आहे.पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गळती काढण्याचे काम गुरुवारी (दि. १७) हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी १० ते १२ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा या भागासह कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.शुक्रवारी (दि. १८) सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ तसेच कात्रेवाडा टाकी, कोटेश्वर टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी व कोटेश्वर टाकीतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार (दि. १९) व रविवारी (दि. २०) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी बापट यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीRainपाऊस