शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
4
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
5
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
6
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
7
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
8
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
9
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
10
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
11
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
12
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
13
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
14
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
15
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
16
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
17
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
18
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
19
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
20
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात नेत्यांकडून मोर्चेबांधणी, साताऱ्यात नेते गाफील; 'पुणे पदवीधर'साठी युवकांची ताकद संघटित करण्याची गरज

By दीपक देशमुख | Updated: December 10, 2025 18:49 IST

भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू

दीपक देशमुखसातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त नोंदणी झाल्यास जिल्ह्यातील उमेदवाराला ताकद मिळू शकते. परंतु, या महत्त्वाच्या टप्प्यावर जिल्ह्यातील सर्व नेते उदासीन दिसत आहेत, तर पुणे जिल्ह्यातील नेतेमंडळींकडून नोंदणीच्या निमित्ताने मोर्चेबांधणी धडाक्यात सुरू आहे. हा गाफीलपणा निवडणुकीला नुकसानकारक ठरू शकत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०२६ मध्ये होणार असून, नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. यानंतर दि. १८ डिसेंबरपर्यंत दावे, हरकती असल्याने आणखी काही दिवस नोंदणीला मिळाले आहेत. परंतु, सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, अशी राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही. जिल्ह्यातील लाखो युवक पदवीधर आहेत. त्यामुळे पदवीधर नोंदणीला आणखी वाव आहे.

कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये साताऱ्यातील इच्छुकांचा पक्षाकडून विचार होण्यासाठी जिल्ह्यातील युवकांची साथ गरजेची आहे. अन्यथा, उमेदवारी मिळवण्यात आणि प्रत्यक्षात निवडणुकीला पुणे अथवा कोल्हापूर जिल्ह्यांचाच वरचष्मा राहू शकतो.

पाच जिल्ह्यांचा मतदारसंघपुणे पदवीधर मतदारसंघात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे आणि कोल्हापूर हे मोठे जिल्हे असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. या मतदारसंघात २०२० मध्ये महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे या खेपेस भाजपने पुण्यात मोठी मोर्चेबांधणी केली आहे.

महाविकास आघाडीचे जि. प.वर लक्ष केंद्रितसध्या महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. दोन्ही पक्षांचे लक्ष सध्या तरी जिल्हा परिषद निवडणुकांवर केंद्रित असल्याचे दिसत आहे.

भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू

  • भाजपकडून गतवेळच्या पराभवातून धडा घेत पुण्यात जोरदार माेर्चेबांधणी सुरू झालेली आहे. परंतु, सातारा जिल्ह्यामध्ये काहीच हालचाल दिसून येत नाही. 
  • जिल्ह्यातून भाजपातील विक्रम पावसकर, अमित कुलकर्णी, धैर्यशील कदम, दत्ताजी थोरात, किशोर गोडबोले या नावांची चर्चा होत असली तरी नगरपालिका निवडणुकीवेळी युवकांपर्यंत पोहोचण्याची संधीही जिल्ह्यातून दवडली असल्याचे दिसत आहे.
  • मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतूनही पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यानंतरच हालचाल होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Pune Graduates: Mobilization in Pune, Leaders Neglect Satara, Youth Strength Needed

Web Summary : Pune leaders mobilize for graduate elections; Satara lags. Registration vital for district candidates. Kolhapur, Pune dominate without Satara youth support. BJP actively campaigning.