‘लोकमत युवा नेक्स्ट’ सभासद नोंदणी सुरू

By Admin | Updated: November 7, 2014 23:40 IST2014-11-07T21:34:03+5:302014-11-07T23:40:38+5:30

आकर्षक बक्षिसे : हमखास भेटवस्तू मिळणार

Launch of 'Lokmat Yuva Next' member registration | ‘लोकमत युवा नेक्स्ट’ सभासद नोंदणी सुरू

‘लोकमत युवा नेक्स्ट’ सभासद नोंदणी सुरू

सातारा : महाविद्यालयीन युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या सभासद नोंदणीला ‘लोकमत’ कार्यालयामध्ये सुरुवात झाली आहे. कॉलेजमधील युवक-युवतींची समाजात नवीन ओळख निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने ‘युवा नेक्स्ट’ कार्यरत असते. आणि याच माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. २०१४-१५ या वर्षामधील सभासद होणाऱ्या प्रत्येक सभासदास २०० रुपये नोंदणी शुल्क भरून आठ जीबी पेन ड्रॉइव्ह, करिअर बुक आणि आकर्षक ओळखपत्र मिळणार आहे. त्याचबरोबर लकी ड्रॉ द्वारे अ‍ॅम्बिशन क्लासेसतर्फे आकर्षक मोबाईल जिंकण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक सभासदास हमखास भेटवस्तू कूपनमध्ये एलिक्झर क्लासेसतर्फे पर्सनालटी डेव्हलपमेंट कोर्स आणि लायन्स क्लब आॅफ सातारा कॅम्प नॅब हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्रतपासणी करून मिळणार आहे.
सभासद होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सभासद नोंदणी कोणत्याही शाखेचे, कोणत्याही महाविद्यालयातील युवक-युवती करू शकतात. नाव नोंदणीसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. कोणीही पालक आपल्या पाल्यांची नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी ‘लोकमत’ कार्यालय, पहिला मजला, गुरुअलंकार कॉम्प्लेक्स शेटे चौक, गुरुवार पेठ, सातारा ९७६२५२७१0९, ९९२२२४९९१४ येथे संपर्क साधावा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन ‘लोकमत युवा नेक्स्ट’ मार्फत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of 'Lokmat Yuva Next' member registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.