महामार्ग पोलीस केंद्र भुईंजमार्फत ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:24+5:302021-02-05T09:16:24+5:30

सातारा : महामार्ग पोलीस केंद्र, भुईंजमार्फत आनेवाडी टोल नाका येथे ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ झाला. यावेळी ...

Launch of 32nd National Road Safety Campaign through Highway Police Station Bhuiyanj | महामार्ग पोलीस केंद्र भुईंजमार्फत ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

महामार्ग पोलीस केंद्र भुईंजमार्फत ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

सातारा : महामार्ग पोलीस केंद्र, भुईंजमार्फत आनेवाडी टोल नाका येथे ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ झाला. यावेळी पोलिसांनी वाहनधारकांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन केले.

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक संजय जाधव सर (भा.पो.से.), पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर सर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे विभाग यांचे मार्गदर्शनानुसार महामार्ग पोलीस केंद्र भुईंज हद्दीमध्ये राबविण्यात येणार्‍या ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात आनेवाडी टोल नाका येथून करण्यात आली आहे.

यावेळी रिलायन्सचे रिजनल हेड अंकित भाटिया यांच्याहस्ते महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाची फित कापून रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, सातारा हायवे मॅनेजर संकेत गांधी, आनेवाडी टोल मॅनेजर रघुवीरसिंग, भुईंज टॅपचे अंमलदार, हायवे पेट्रोलिंग स्टाफ टोल नाका येथील कर्मचारी, वाहनचालक, नागरिक उपस्थित होते. त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत अवगत करून त्यांचे प्रबोधन केले.

त्याचप्रमाणे उपस्थित वाहनचालक, नागरिकांना वाहतूक मार्गदर्शक पत्रके वाटप करण्यात आली. आनेवाडी टोल नाका येथे वाहन चालकांना थांबवून त्यांना इंटरसेप्टर वाहनाची माहिती देण्यात आली. ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत, अशा वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.

तयार करण्यात आलेला चित्ररथ महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये फिरवण्यात येणार असून त्याचबरोबर ऑडिओ संदेशाच्या माध्यमातूनसुद्धा नागरिकांना वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी दिली.

फोटो ओळ :

आनेवाडी टोलनाका येथे वाहनधारकांना वाहतूक मार्गदर्शक पत्रकांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Launch of 32nd National Road Safety Campaign through Highway Police Station Bhuiyanj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.