शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

कृत्रिम तळं हवंय तीस वर्षांसाठी

By admin | Updated: November 11, 2015 00:15 IST

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : विसर्जनचा खर्च टाळण्यासाठी आत्तापासूनच हालचाली

सातारा : दरवर्षी मंगळवार तळे आणि मोती तळ्यात गणेश विजर्सन केले जात होते. विसर्जनानंतर तळ्यातील गाळ काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत होता. त्यामुळे शहरातील ऐतिहासिक तळ्यांची दयनीय अवस्था झाली होती. यंदा मात्र, दोन्ही तळ्यांमध्ये विसर्जन न करता पालिकेने कृत्रिम तलाव तयार करून ऐतिहासिक वारसा जपला; परंतु कृत्रिम तळ्याची जागा जिल्हा परिषदेची असल्याने दरवर्षी याच ठिकाणी गणेश विसर्जन व्हावं, यासाठी पालिकेने आत्तापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. सातारा शहरात यंदा प्रथमच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन पार पडले. राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती फार्म येथे जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा आहे. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेला विसर्जन कालावधीसाठी काही अटींवर मिळाली होती. पालिकेनेही या जागेवर उत्कृष्ठ असा कृत्रिम तलाव तयार करून विसर्जनची सोय केली. शहरातील सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मूर्तींचे विसर्जन केले. हा कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी पालिकेला लाखो रुपये खर्च आला. दरवर्षी याच तळ्यामध्ये विसर्जनला परवानगी मिळाली तर पालिकेचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे आत्तापासून पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.हेच कृत्रिम तळे पालिकेला तीस वर्षांसाठी दिले तर कायमस्वरूपी विसर्जनाची सोय होईल. शिवाय दरवर्षी कृत्रिम तळे तयार करण्यासाठी होणारा खर्चाची बचत होईल, या हेतूने पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी कृृत्रिम तलाव तयार करण्यास पालिका तयार आहे. १०० बाय १०० मीटर जागा पालिकेला आवश्यक असून, या जागेवर शासनाची मालकी राहील तसेच देखभाल दुरुस्तीसाठी तीस वर्षांच्या मुदतीत पालिकेला ही जागा उपलब्ध करून द्यावी. या ठिकाणी पालिकेमार्फत कृत्रिम तलावाबरोबरच तलावाच्या परिसराचे सुशोभीकरण करून सुंदर असा परिसर विकसित करण्यात येईल. तरी ही जागा पालिकेला उपलब्ध करून द्यावी, अशा स्वरूपाचे पत्र नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी)विसर्जनासाठी दरवर्षी खर्च करण्यापेक्षा प्रतापसिंह शेती फार्म येथील जागा कायमस्वरूपी मिळाल्यास पालिकेचा खर्चही वाचेल. शिवाय नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याची सवय लागेल.- विजय बडेकर, नगराध्यक्ष, सातारा