‘जयवंत शुगर्स’चा अंतिम दर दोन हजार ३९३ रुपये
By Admin | Updated: October 11, 2015 00:07 IST2015-10-11T00:03:34+5:302015-10-11T00:07:49+5:30
टनाला २५० रुपयांप्रममाणे रक्कम खात्यावर जमा

‘जयवंत शुगर्स’चा अंतिम दर दोन हजार ३९३ रुपये
कऱ्हाड : धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने २०१४-१५ सालातील गळित हंगामात गाळप झालेल्या उसाला २,३९३ रुपये इतका उच्चांकी अंतिम दर जाहीर केला आहे. अंतिम दरातील २५० रुपये प्रतिमेट्रिक टन इतकी रक्कम सोमवार, दि. १२ रोजी सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. उच्चांकी दरामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांंमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जयवंत शुगर्सच्या सन २०१४-२०१५ च्या गळित हंगामास १९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला होता. त्यानंतर झालेल्या १७३ दिवसांच्या कालावधीत एकूण ४ लाख ४० हजार १९० मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून, ५ लाख १७ हजार २२० क्विंंटल साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले आहे. कोणत्याही उपपदार्थांचे उत्पादन न घेता जयवंत शुगर्सने नेहमीच उच्चांकी दर देण्याची परंपरा याहीवर्षी कायम राखली आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणे हा दर देण्यात आला असून, कारखान्यामार्फत यापूर्वी गाळप झालेल्या ऊस बिलापोटी २१०० रुपये या अगोदरच अदा करण्यात आले आहेत.
अंतिम दरातील २५० रुपये प्रतिमेट्रिक टन इतकी रक्कम येत्या सोमवारी (दि. १२) खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर उर्वरित ४३ रुपयेही लवकरात लवकर अदा करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)