शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

टाईपरायटरचा अखेरचा श्वास ! शासनाकडून वर्षासाठी मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:55 IST

महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टाईपरायटरला चालू वर्षापासून ब्रेक देण्याची सहमती दर्शविली होती; परंतु पुन्हा यात बदल करून नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, यामुळे शासकीय वाणिज्य टायपिंग प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना टाईपरायटर शिकावे लागणार आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे टाईपरायटरला २०१९ पर्यंत मुदतवाढ, प्रमाणपत्रासाठी लागतंय शिकायलासंगणकीय क्रांतीमुळे टाईपरायटरचा वापर कमी अनेक कार्यालयांत बंद अवस्थेतील टाईपरायटरचा ढीग टायपिंग शिकायचे आणि काम संगणकावर असा विरोधाभास

सातारा : महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टाईपरायटरला चालू वर्षापासून ब्रेक देण्याची सहमती दर्शविली होती; परंतु पुन्हा यात बदल करून नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, यामुळे शासकीय वाणिज्य टायपिंग प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना टाईपरायटर शिकावे लागणार आहे.संगणकीय क्रांतीमुळे टाईपरायटरचा वापर कमी होऊ लागला आहे, यामुळे नजीकच्या काळात टाईपरायटरची टिक-टिक बंद होणार आहे. अनेक कार्यालयांत बंद अवस्थेतील टाईपरायटरचा ढीग साठला आहे.

शासकीय कार्यालयात नोकरी मिळवण्यासाठी टायपिंगशिवाय पर्याय नव्हता, यासाठी दहावी झाल्यानंतर लगेचच टाईपरायटरचा कोर्स लावला जायचा. मागील अनेक वर्षांपासून टाईपरायटर शासकीय कार्यालयातील अभिवाज्य घटक बनला होता; परंतु संगणकामुळे आता हाच टाईपरायटर अखेरच्या घटका मोजत आहे. संगणक, प्रिंटर अशा अत्याधुनिक साधनांमुळे टाईपरायटर कालोघात बाजूला पडले आहे.

शासनाने मुदत वाढ केल्याने पुढील वर्षी प्रमाणपत्र मिळण्यासाठी टाईपरायटर टायपिंगचा क्लासचे वेळापत्रक आजही महाविद्यालयांत दिसत आहे. टाईपरायटिंग शिकायचे ते केवळ शासकीय नोकरी मिळविण्यासाठी!, अशी बेरोजगारांची धारणा आहे. साहजिकच टाईपरायटिंग शिकायचे आणि काम संगणकावर करायचे, असा प्रकार असूनही शासनाच्या कामकाजाचा विरोधाभास पुढे येताना दिसत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार