शिंगणापुरात अखेरचा अभिषेक

By Admin | Updated: June 4, 2014 00:17 IST2014-06-04T00:17:08+5:302014-06-04T00:17:38+5:30

दहिवडी : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने माण तालुक्यावर शोककळा पसरली.

The last Abhishek in Shinganapur | शिंगणापुरात अखेरचा अभिषेक

शिंगणापुरात अखेरचा अभिषेक

दहिवडी : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने माण तालुक्यावर शोककळा पसरली. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी हे मुंडे यांचे मूळ गाव. माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरचा शंभूमहादेव हे त्यांचे कुलदैवत असून, लोकसभेची निवडणूक आटोपल्यावर त्यांनी सहकुटुंब कुलदैवताचे दर्शन घेतले होते. त्यावेळी महादेवाला केलेला अभिषेक अखेरचाच ठरला महाराष्ट्राचे कुलदैवत शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी गोपीनाथ मुंंडे वर्षातून एकदा वेळात वेळ काढून येत असत. यावेळी लोकसभेच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या होत्या. या अनुषंगाने निवडणूक आटोपल्यानंतर निकाल लागण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे, पत्नी प्रज्ञा, मुलगी पंकजा मुंडे-पालवे हे कुलदैवताच्या दर्शनासाठी मुंबईहून हेलिकॉप्टरने आले होते. सातारच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले होते. भाजपचे सरकार स्थापन व्हावे, देशात भाजपची निर्विवाद सत्ता यावी यासाठी त्यांनी शंभूमहादेवाला दुग्धाभिषेकासह साकडे घातले होते. त्यांनी शंभूमहादेवाचे दर्शन घेऊन माण-खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. मे महिन्यातील या ताज्या आठवणींनी कार्यकर्ते आज भावनाविवश झाले आहेत. गोपीनाथ मुंडे यांना कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली आणि दिवसभर दहिवडीत कडकडीत बंद पाळला. (प्रतिनिधी)

Web Title: The last Abhishek in Shinganapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.