शहापुरात दारूचा मोठा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST2021-04-19T04:36:54+5:302021-04-19T04:36:54+5:30

नागेश शिवाप्पा जालवादी (वय ४९, रा. मसुर, ता. कऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपअधीक्षक डॉ. ...

Large stocks of liquor seized in Shahapur | शहापुरात दारूचा मोठा साठा जप्त

शहापुरात दारूचा मोठा साठा जप्त

नागेश शिवाप्पा जालवादी (वय ४९, रा. मसुर, ता. कऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर उपविभागात कडक बंदोबस्ताच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने उपविभागीय कार्यालयातील पोलिसांचे पथक गस्त घालत आहे. तालुक्यातील शहापूर येथील आदित्य परमिट रूम बीयर बारनजीक असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये नागेश जालवादी हा बेकायदा बिगर परवाना दारूविक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एस.डी. शेलार, पोलीस अंमलदार प्रवीण पवार, सागर बर्गे यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेथे सुमारे ३४ हजार रुपये किमतीचे दारूचे चौदा बॉक्स आढळून आले. पोलिसांनी हा दारूसाठा हस्तगत केला. या प्रकरणी नागेश जालवादी याच्या विरोधात पोलीस अंमलदार प्रवीण पवार यांनी फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Large stocks of liquor seized in Shahapur