शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याजवळ जिलेटीन स्फोटकाचा मोठा साठा जप्त, व्यापाऱ्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 17:31 IST

Crimenews Karad Satara : पाटण तालुक्यातील तारळे येथील व्यापाऱ्याकडून जिलेटीन स्फोटकाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यासह त्याला स्फोटक पुरविणाऱ्या सांगलीतील एकास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सातारच्या दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली.

ठळक मुद्देजिलेटीन स्फोटकाचा मोठा साठा जप्त, तारळेत कारवाई व्यापाऱ्यासह दोघांना अटक; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कऱ्हाड/उंब्रज : पाटण तालुक्यातील तारळे येथील व्यापाऱ्याकडून जिलेटीन स्फोटकाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यासह त्याला स्फोटक पुरविणाऱ्या सांगलीतील एकास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सातारच्या दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली.गोविंदसिंग बाळूसिंग रजपूत-यादव (रा. तारळे) व रतनलाल बाळोजी जाट (रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्यासह पथक बुधवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी पाटण तालुक्यातील तारळे येथे एका व्यापाऱ्याने स्फोटकाचा साठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार या पथकाने सायंकाळी गोविंदसिंग रजपूत या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शौचालयात चार खोकी आढळून आली.

दहशतवाद विरोधी पथकाने खोकी तपासली असता त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. तसेच घरासमोर उभ्या असणाऱ्या जीपमध्येही जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. खोक्यात आढळलेल्या ९ हजार ४५३ रुपयांच्या ८३६ जिलेटीनच्या कांड्यांसह ३ लाख रुपये किमतीची जीप पथकाने जप्त करून आरोपी गोविंदसिंग रजपूत याला अटक केली.दरम्यान, रजपूतला वाटेगाव येथील रतनलाल जाट हा जिलेटीन पुरवित असल्याची माहिती उंब्रजचे सहाय्यक निरीक्षक अजय गोरड यांना मिळाली. त्यानुसार उंब्रजच्या पोलीस पथकाने बुधवारी रात्री उशिरा वाटेगावमध्ये छापा टाकून रतनलाल जाट याला ताब्यात घेत अटक केली. याबाबत दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर भोसले यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.दोन दिवसांची कोठडीस्फोटकांचा साठा करून ठेवल्याप्रकरणी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना उंब्रज पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. आरोपींकडे विविध मुद्यांवर तपास करावा लागणार असल्यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस