शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यात रानडुकरांच्या उपद्रवामुळे ज्वारीचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:08 IST

वाई तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने वाई तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट आलेले नाही. डोंगर पठारावरसुद्धा याची भीषणता यावर्षी जाणवत नाही. मात्र, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून मोठ्या प्रमाणात नासाडी करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देवाई तालुक्यात रानडुकरांच्या उपद्रवामुळे ज्वारीचे मोठे नुकसानभीषण संकट : अन्नधान्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बनलाय गंभीर

वाई : वाई तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने वाई तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट आलेले नाही. डोंगर पठारावरसुद्धा याची भीषणता यावर्षी जाणवत नाही. मात्र, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून मोठ्या प्रमाणात नासाडी करताना दिसत आहेत.

अरगड ज्वारीचे कणीस खाण्यासाठी संपूर्ण ताटे जमीनदोस्त करून खात असल्याने पिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाईच्या पश्चिम भागासह संपूर्ण तालुक्यात हजारो एकर जमिनीतील अरगड ज्वारीचे रानडुक्कर व भटक्या प्राण्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे.ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल, कांदा, पावटा, वाटाणा, बाजरी यासारख्या निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना याची झळ बसत आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

शेतकरी आपल्या शेतात रानडुकरांचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविताना दिसत आहे. संपूर्ण शेताला साडीने लपेटण्यात येते. तसेच आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधण्यात येतात, थायमेट घालण्यात येते, रात्रभर शेकोटी पेटवून खडा पहारा दिला जातो. तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून पीक फस्त केले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी