कऱ्हाडात लसीकरणासाठी मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:40 IST2021-05-11T04:40:52+5:302021-05-11T04:40:52+5:30

कऱ्हाड : कऱ्हाडमध्ये सोमवारी उपजिल्हा रूग्णालय व पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. काही ...

Large crowd for vaccination in Karachi | कऱ्हाडात लसीकरणासाठी मोठी गर्दी

कऱ्हाडात लसीकरणासाठी मोठी गर्दी

कऱ्हाड : कऱ्हाडमध्ये सोमवारी उपजिल्हा रूग्णालय व पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. काही दिवसांपासून लसीचा तुटवडा होता. मात्र, उपलब्ध झालेल्या लसीसाठी सोमवारी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकजण सकाळी सहा वाजल्यापासूनच लस घेण्यासाठी रांगेत उभे होते.

उपजिल्हा रुग्णालयात आज दुसर्‍या डोससाठी कोव्हॅक्सिनचे ९० डोस उपलब्ध होते तर कोविशिल्डच्या पहिल्या डोससाठी ३३ व दुसर्‍या डोससाठी ७७ डोस उपलब्ध होते. पण तीनशेवर नागरिक लसीकरणासाठी येथे दाखल झाले होते. तर दुसरीकडे नगर परिषदेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० डोस उपलब्ध असताना याठिकाणीही मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या दोन्ही केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांमध्ये वादविवादाचे प्रसंग घडले. अखेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने लसीकरण सुरळीत सुरू झाले.

फोटो

Web Title: Large crowd for vaccination in Karachi