लेन तोडून कंटेनर कारवर आदळला; महिला ठार
By Admin | Updated: October 2, 2016 00:56 IST2016-10-02T00:54:44+5:302016-10-02T00:56:09+5:30
एकाच कुटुंबातील चारजण जखमी

लेन तोडून कंटेनर कारवर आदळला; महिला ठार
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंडनजीक कंटेनरने लेन तोडून येऊन कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार तर कारमधील एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी
चारच्या सुमारास झाला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रत्नाबाई अंकुश माने (वय ५५, रा. वाई) असे अपघातात ठार झालेल्या तर राहुल अंकुश माने (३०), दादा अंकुश माने (३५), अंकुश बाबूराव माने (६०), तेजल राहुल माने (२, सर्व रा. वाई) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माने कुटुंबीय शनिवारी सायंकाळी कारने साताऱ्यामधून वाई येथे निघाले होते. लिंबखिंडनजीक असणाऱ्या डी-मार्टजवळ पुणे बाजूकडून आलेल्या कंटेनरवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे हा कंटेनर पलटी होऊन व् ि
ारुद्ध लेनवर आला. माने कुटुंबीयांच्या कारवर हा कंटेनर जोरदार आदळला. त्यामध्ये रत्नाबाई माने या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर काही नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले.
त्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी त्यानंतर अथक परिश्रम करून वाहतूक पूर्ववत केली. (प्रतिनिधी)