शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा वाद, न्यायालयात हजर राहाता येऊ नये म्हणून हायकोर्टाचे समन्स चोरले; घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 16:40 IST

सातारा: अमेरिकेहून मुलांना भेटून साताऱ्यात आल्यानंतर हायकोर्टाने पाठविलेले समन्स चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकारानंतर संबंधित वृद्ध वकिलांनी घरातील ...

सातारा: अमेरिकेहून मुलांना भेटून साताऱ्यात आल्यानंतर हायकोर्टाने पाठविलेले समन्स चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकारानंतर संबंधित वृद्ध वकिलांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोन अनोळखी व्यक्तींनी ते समन्स चोरून नेल्याचे कैद झाले. हा सारा खटाटोप न्यायालयात हजर राहता येऊ नये म्हणून केला असल्याचे संबंधित वकिलांनी पोलिसांना सांगितले.साताऱ्यातील रविवार पेठेत राहणारे ॲड. विजयसिंह घोरपडे (वय ७६) हे मूळचे नांदगाव, ता. सातारा येथील रहिवासी आहेत. त्यांची तिन्हीही मुले अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. मुलांना भेटण्यासाठी ते १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अमेरिकेला गेले होते. दरम्यान, न्यायालयात जमिनीचा त्यांचा दावा सुरू आहे. या दाव्यातील रिट पिटीशन समन्स हायकोर्टाने त्यांना बजावले होते. काही दिवसांपूर्वी ते अमेरिकेहून साताऱ्यात आले. त्यावेळी त्यांच्या घराजवळ समन्स अडकवलेले त्यांना दिसले नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये दोघेजण ते समन्स चोरून नेताना स्पष्टपणे दिसून आले.या प्रकारानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जावरून तपास केल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल केला. ॲड. घोरपडे यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असून, त्यानंतरच समन्स चोरून नेणाऱ्यांची ओळख पटणार आहे. हा सारा प्रकार ॲड. घोरपडे यांनी न्यायालयात हजर राहू नये, यासाठी केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी