घरफोडी करून ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:55+5:302021-08-27T04:42:55+5:30
शिरवळ : कवठे हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाट तोडून कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख ...

घरफोडी करून ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास
शिरवळ : कवठे हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाट तोडून कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कवठे या ठिकाणी जितेंद्र मारुती जाधव हे कुटुंबीयांसमवेत राहतात. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करीत कपाटातील ३० हजार रुपये किमतीचे एक दीड तोळ्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पायातील सात जोड पैंजण, तीन जोड मनगट्या, वाळे, एक चांदीचा करदोडा व ४ हजार रुपये रोख रक्कम असा ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेची फिर्याद जितेंद्र जाधव यांनी दिली. सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे तपास करीत आहेत.