पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:14+5:302021-06-16T04:50:14+5:30

कऱ्हाड : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील रोख ५० हजार व तीन तोळे दागिने असा सुमारे पावणेदोन ...

Lampas looted Rs 52 lakh | पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

कऱ्हाड : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील रोख ५० हजार व तीन तोळे दागिने असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. शहरातील वाखाण रोड परिसरात घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाखाण रोड मार्गानजीक अवधूत भरतसा कलबुर्गी हे वास्तव्यास आहेत. तीन दिवसांपूर्वी कामानिमित्त कुटुंबीयांसह ते बाहेरगावी गेले होते. त्यानंतर सोमवारी ते पुन्हा कऱ्हाडमध्ये आल्यानंतर बंगल्यातील साहित्य विस्कटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबत त्वरित शहर पोलिसात संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरातील पन्नास हजारांची रोकड व तीन तोळे दागिने चोरीस गेल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ, श्वानपथक यांना पाचारण केले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

घरफोडीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने माहिती घेतली. तसेच चोरट्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. घटनेची नोंद रात्री उशिरा शहर पोलिसात झाली आहे.

Web Title: Lampas looted Rs 52 lakh