देऊरमधील घरफोडीत १२ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST2021-04-12T04:37:20+5:302021-04-12T04:37:20+5:30
वाठार स्टेशन : देऊर, ता. कोरेगाव येथे दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि दागिन्यांसह १२ लाख ६ ...

देऊरमधील घरफोडीत १२ लाखांचा ऐवज लंपास
वाठार स्टेशन : देऊर, ता. कोरेगाव येथे दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि दागिन्यांसह १२ लाख ६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विकास तुकाराम कदम यांनी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविराेधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विकास कदम यांच्या देऊरमधील घराचा अज्ञात चोरट्याने कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात असणाऱ्या कपाटातील लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. या घरफोडीत १२ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे तपास करीत आहेत.