घरकाम करणाऱ्या महिलेकडून दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST2021-03-14T04:34:49+5:302021-03-14T04:34:49+5:30

सातारा : घरकाम करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेने एकाच्या घरातून ७५ हजारांचे दागिने चोरून नेल्याचा आरोप झाल्याने संबंधित महिलेवर सातारा ...

Lampas with jewelry from a housewife | घरकाम करणाऱ्या महिलेकडून दागिने लंपास

घरकाम करणाऱ्या महिलेकडून दागिने लंपास

सातारा : घरकाम करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेने एकाच्या घरातून ७५ हजारांचे दागिने चोरून नेल्याचा आरोप झाल्याने संबंधित महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उमा बजरंग शिंदे (६५, रा. माने हॉस्पिटलच्या पाठीमागे, विसावा नाका, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. उमा शिंदे या लता बळवंत गायकवाड (५५, रा. ज्ञानेश्वरी अपार्टमेंट, विसावा नाका, गोडोली, सातारा) यांच्या घरी काम करतात. दरम्यान, गायकवाड यांनी त्यांच्या घरातील दागिने देवघरात असणाऱ्या ड्राव्हरमध्ये ठेवले होते. मात्र, त्यांच्या घरातून दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते दि. १० मार्च सायंकाळी सात या वेळेत ७३ हजारांचे दागिने चोरीस गेले. फ्लॅटचा दरवाजाचे कुलूप, खिडकी कोठेही तोडलेली नसताना सोने चोरीला गेल्याने लता गायकवाडही अवाक् झाल्या. दागिने ठेवण्याची जागा इतरांना सहजासहजी न दिसणारी होती. त्यामुळे दागिने घरकामासाठी असणाऱ्या उमा शिंदे हिने चोरून नेले असल्याची त्यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात शिंदे यांच्याविरोधात तक्रार केली.

Web Title: Lampas with jewelry from a housewife