‘राजधानी दांडिया’त लाखोंची बक्षिसे

By Admin | Updated: October 13, 2015 23:51 IST2015-10-13T20:44:52+5:302015-10-13T23:51:30+5:30

१७ रोजी प्रारंभ : ‘जिजाऊ प्रतिष्ठान’तर्फे ‘अनंत इंग्लिश’मध्ये धमाल

Lakhs of prizes in 'Capital Dandiya' | ‘राजधानी दांडिया’त लाखोंची बक्षिसे

‘राजधानी दांडिया’त लाखोंची बक्षिसे

सातारा : खेळ आणि कला यांचा सुंदर मिलाप घालण्याच्या दृष्टीने जिजाऊ प्रतिष्ठान आणि शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येथील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये १७ ते २० दरम्यान फक्त महिला व तरुणींसाठी मोफत ‘राजधानी रास दांडिया’चे आयोजन केले आहे. चार दिवसांत साडे तीन लाखांच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.
या कार्यक्रमाविषयी माहिती देताना जिजाऊ प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सिद्धी रवींद्र पवार म्हणाल्या की, महिलांना रास दांडिया खेळण्याची इच्छा असते. मात्र, मुलांचा धांगडधिंगा असल्याने त्या जाऊ शकत नाही. त्यामुळे ‘जिजाऊ’तर्फे गेली तीन वर्षे केवळ महिला आणि तरुणींसाठी दांडियाचे आयोजन केले जाते. किशोर कुमार यांचा आवाज काढणारे चंदू चव्हाण आणि पार्श्वगायक दिग्विजय जोशी हे यंदाचे खास आकर्षण असणार आहेत. याठिकाणी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यातून दररोज एका भाग्यवान विजेत्याला बक्षिस दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक महिलेचा दोन लाखांचा वर्षभरासाठी विमा दिला जाईलस्पर्धेत सहभागी होण्यासाठी पहिल्याच दिवशी नोंदणी करणे बंधनकारक आहे. पेहराव, नाविन्यपूर्ण स्टेप व कल्पना, खेळातील सातत्य यांचा विचार केला जाणार आहे. यातून रोज एकीला ‘दांडिया क्विन आॅफ द डे’ म्हणून निवडली जाईल. तीन दिवसांच्या क्विनमधून चौथ्या दिवशी ‘राजधानी क्विन’साठी सामना रंगणार आहे. यासाठी चार दिवसांची उपस्थितीत व सर्वसमावेशक नृत्य करता येणे बंधनकारक आहे. राजधानी क्विनला पुढील वर्षी मानाचे स्थान, समितीमध्येही सहभागी करुन घेतले जाणार आहे. या स्पर्धा ५ ते १५ आणि १५ वर्षांपुढील खुला अशा दोन गटांत होणार आहेत. गु्रप डान्स, सोलो व पेहराव यांचा विचार करुन
बक्षिस वितरण करण्यात येणार
आहे. (प्रतिनिधी)


पहिल्या तिघींना पतीसमवेत विमानातून केरळ सहल
तीन दिवस ‘दांडिया क्विन आॅफ द डे’मधून ‘राजधानी दांडिया क्विन २०१५’साधी स्पर्धा होईल. प्रथम तीन विजेतींना पतीसमवेत सात दिवसांसाठी ‘रॉकिंग हॉलिडेज’तर्फे विमानाने केरळ सहल घडवून आणली जाणार आहे. तसेच मानाचे फेटेही देण्यात येणार आहेत.


गेली तीन वर्षे या दांडियाच्या कार्यक्रमात सतत सहभागी होत आहेत, अशी एक महिला व एका तरुणी यांना हिऱ्याची चमकी दिली जाणार आहे.
- सिद्धी पवार, संस्थापक अध्यक्षा, जिजाऊ प्रतिष्ठान

Web Title: Lakhs of prizes in 'Capital Dandiya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.