झेंडूच्या बागेतून लाखांची कमाई

By Admin | Updated: November 9, 2015 23:27 IST2015-11-09T21:35:53+5:302015-11-09T23:27:52+5:30

ही रानवाट वेगळी...

Lakhs of millions from the marigold garden | झेंडूच्या बागेतून लाखांची कमाई

झेंडूच्या बागेतून लाखांची कमाई

दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यात आता पारंपरिक शेतीची कास सोडून बदलून वेगळ्या पद्धतीने शेती केली तर त्यातून फायदा हा नक्कीच घेता येतो, हे दाखवून दिले आहे. येथील सुशिक्षित शेतकरी भावांनी बी. कॉम शिक्षण घेऊन अकौन्टंटची नोकरी सोडून शेतीकडे वळलेले उमेश भिसे आणि त्यांच्यासोबत या कामात मदत करणारे त्यांचे लहान भाऊ डॉ. महेश भिसे यांना पारंपरिक पद्धतीने शेती करत राहण्यापेक्षा शेतात नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने नवनवीन पिके घेऊन विविध उत्पादने घेण्यामध्ये अधिक रस आहे. त्यामुळे कृषी सहायक तसेच तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्याने शेतात नवनवीन पिके घणारे भिसे बंधूंनी चालूवर्षी दीड एकरामध्ये ‘अ‍ॅरोगोल्ड’ नावाच्या झेंडूच्या रोपांची गादी वाफा पद्धतीने लागण केली आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून संपूर्ण प्लॉटवरील रोपांना पाण्याची सोय करण्यात आली आहे.
रोप लागणीनंतर साधारण या फुलांचे आठ ते दहा तोडे शेतकरी घेऊ शकतो. या पूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर या प्लॉटमधील फुले मार्केटमध्ये गेली आहेत. ऐन दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर या बंधूंनी तिसऱ्या तोड्यात ९०० ते १००० किलोचा फुलांचा माल तोडला आहे. वेळच्या वेळी या रोपांची योग्य ती निगा राखल्यास या पद्धतीच्या शेतातून भरघोस उत्पादन घेता येते. तसेच पारंपरिक निसर्गावर आधारित शेती करत असताना निसर्गाच्या बेभरवशीपणामुळे आजपर्यंत शेतकरी हा नेहमीच तोट्यातच जात आहे. त्यामुळे या पद्धतीत बदल करून कमी पाण्यात ड्रिपरच्या साह्याने अधिक उत्पादन घेऊन शेती कशी फायद्याची हे भिसे बंधूंनी दाखवून दिले आहे. या पूर्वीही यांनी प्लॉवरचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या फुलांच्या शेतीतून आर्थिक फायदा होतो. फक्त ते करण्यासाठी शेतकरी वर्गाने मानसिकता बदलली पाहिजे, हे यांनी दाखवून दिले आहे. शेतात वेगवेगळी पिके घेऊन नेहमी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आवड असल्यामुळे या तरुण शेतकरी बंधूंनी प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलौकीकही प्राप्त केला आहे.


सुरुवातीलाच जर फायद्याचा विचार करत बसलो तर पुढे जाताच येणार नाही. आणि याच विचारातून आम्ही दोघा भावांनी या शेतात नवनवीन पद्धतीची पिके घेण्याचे ठरवले आणि त्या पद्धतीने पिके घेत गेलो. ठिबकच्या साह्याने शेती करणे फार फायदेशीर ठरत आहे. पाण्याचा योग्य तेवढा वापर होऊन उत्पादनही भराघोस मिळवता येत आहे. आम्ही या फुलांच्या शेतीकरिता मोबाइलचा वापरही केला आहे. सध्या मोबाइलवरून वेगवेगळे फोटो काढून ते सिझेंटा कंपनीचे अधिकारी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले जात आहेत. या फुलांच्या उत्पादनातून लाख ते दीड लाख रुपयापर्यंत फायदा मिळेल .
- उमेश भिसे,

Web Title: Lakhs of millions from the marigold garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.