महिला सरपंचाच्या खुर्चीवर बसलाय दीर

By Admin | Updated: October 9, 2015 21:51 IST2015-10-09T21:51:51+5:302015-10-09T21:51:51+5:30

सदस्याचा आरोप : कोरेगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

The lady sat on the sarpanch's chair | महिला सरपंचाच्या खुर्चीवर बसलाय दीर

महिला सरपंचाच्या खुर्चीवर बसलाय दीर

वाठार स्टेशन : परतवडी सरपंचांच्या खुर्चीवर महिला सरपंचाचा दीरच बसला आहे. व्यक्ती ग्रामसेवक व सदस्यांसमोर सतत बसून या खुर्चीचा अवमान करत आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्या आशा नवनाथ दिसले यांनी कोरेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.या निवेदनात म्हटले आहे की, सरपंचपदाची खुर्ची ही गावासाठी भूषणावह आहे. या खुर्चीवर बसण्याचा अधिकार हा दुसऱ्या कोणासही नाही. सरपंच आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. खुर्चीचा अवमान होत असताना पाहत बसणाऱ्या अथवा अशा लोकांना अटकाव करण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकाची तातडीने बदली करावी, अन्यथा गावातील सर्वांनाच या खुर्चीवर बसण्यास परवानगी द्यावी. ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही त्या गावच्या विकासाचा कणा समजली जाते. ग्रामीण भागातील या ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात, यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. आगामी काळात गावच्या लोकसंख्येनुसार वर्गवारी करत शासन विकासासाठी निधी ग्रामपंचायतींना देण्याच्या तयारीत आहे. गावचा कारभार करणारी ही स्थानिक स्वराज्य संस्था सुरळीत चालविण्यासाठी सरपंच व शासनाचा अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांची जबाबदारी मोठी आहे. सरपंचपद हे नेहमीच त्या गावासाठी भूषणावह असते. त्या पदासाठी अनेकवेळा सत्ता संघर्षही होतात. सरपंचाच्या खुर्चीचा हव्यास सर्वांनाच असतो, म्हणून कोणी या खुर्चीवर बसण्याचे धाडस करत नाही. सरपंचपदाचा मान हा नेहमीच मोठा आहे व तो राहावा, अशीच भावना ग्रामस्थांची आहे. (वार्ताहर)

म्हणणे मांडण्यासाठी बजावल्या नोटिसा
परतवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतमधील सरपंचांच्या खुर्चीचा अवमान होत असल्याबाबत केलेल्या तक्रार अर्जाबाबत संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, संबंधित व्यक्ती, संगणक आॅपरेटरांनी १९ आॅक्टोबर रोजी कोरेगाव पंचायत समितीत उपस्थित राहून आपापले म्हणणे मांडण्याबाबत चौकशी अधिकारी सी. एन. घारे यांनी नोटिसी बजावल्या आहेत. याबाबतचा निर्णय यादिवशी स्पष्ट होणार आहे.
परतवाडी ग्रामपंचायतीत खुर्च्यांची कमतरता आहे.
२ आॅक्टोबर रोजी ग्रामसभा होती. या सभेचे अध्यक्ष संबंधित व्यक्ती असल्याने ते या ठिकाणी बसले होती. परंतु तक्रारदार या सभेस अनुपस्थित असताना त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेली तक्रार योग्य नाही. संबंधित व्यक्ती यापूर्वी एकवेळ या खुर्चीवर बसलेली असताना मी ग्रामसेवक या नात्याने त्या खुर्चीवर बसू नये, अशी त्यांना विनंती केली होती.
- शेखर लंगुटे,
ग्रामसेवक परतवडी

चौकशीची मागणी; संबंधितांवर कारवाई
परतवडी ग्रामपंचायतीमधील हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना कोरेगावच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे म्हणाल्या, ‘परतवडी ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत दिलेले निवेदन मिळाले आहे. याबाबत तक्रारदार, संबंधित व्यक्ती व सरपंच यांचे म्हणने ऐकून घेऊन हा प्रकार सत्य असेल, तर संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे.

Web Title: The lady sat on the sarpanch's chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.