मायणी भागात वादळी पावसाने लाखोंची हानी
By Admin | Updated: May 30, 2014 00:52 IST2014-05-30T00:50:39+5:302014-05-30T00:52:08+5:30
मायणी : कलेढोण-मायणी परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिसरातील

मायणी भागात वादळी पावसाने लाखोंची हानी
मायणी : कलेढोण-मायणी परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिसरातील द्राक्षबागा, डाळिंब बागांसह घरांचे पत्रे, पिकअप शेडचे नुकसान झाले आहे. वीजवितरण कंपनीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सलग १६ ते १७ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मायणी-कलेढोण परिसरातील चितळी, म्हासुर्णे, गुंडेवाडी, शेडगेवाडी, मोराळे, पाचवड, विखळे, हिवरवाडी, कण्हेरवाडी, मुळीकवाडी आदी परिसरात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वार्यांसह जोरदार पाऊस झाला. मायणी, शिंदेवाडी, शेडगेवाडी भागात गारपीट झाली आणि लाखो रुपयांचे ननुकसान झाले. मायणी-मोराळे भागातील अनेक घरांचे पत्रे उडाले. कुशी-बोपुशी या पुनर्वसित गावांमध्ये असलेल्या पिक-अप शेडचे नुकसान झाले. मायणी येथील चांदणी चौकामध्ये पिंपरणीचे झाड कोसळून एका दुचाकीचे नुकसान झाले. विजेच्या तारा तुटल्याने राज्य वीज वितरण कंपनीचे (महावितरण) मोठे नुकसान झाले आहे. खांब वाकल्याने आणि वीजवाहक तारा तुटल्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यापासून गुरुवारी सकाळी दहापर्यंत सलग १७ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. उस्मान इनामदार, शिवाजी देशमुख यांच्या द्राक्षबागा व डाळिंब बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. (वार्ताहर)