डोसच्या कमतरतेमुळे लसीकरणाला खिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST2021-06-03T04:28:06+5:302021-06-03T04:28:06+5:30
............. जिल्हा प्रशासनाने एकीकडे लसीकरण मोहिमेला वेग घेतला असतानाच लसीचा तुटवडा मात्र कायम जाणवत आहे. मात्र हे ...

डोसच्या कमतरतेमुळे लसीकरणाला खिळ
.............
जिल्हा प्रशासनाने एकीकडे लसीकरण मोहिमेला वेग घेतला असतानाच लसीचा तुटवडा मात्र कायम जाणवत आहे. मात्र हे डोस पुरेसे नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कारण दिवसाला २८ हजारापर्यंत लसीकरण करण्यात आले होते. असे असताना आता या डोस च्या कमतरतेमुळे लसीकरण मोहिमेला खीळ बसत असल्याची खंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. लोकांकडूनही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना लसीचा तुटवडा होत असल्याने डॉक्टररामधून नाराजी व्यक्त होत आहे.
............
रस्त्यावर विनाकारण फिरू नका असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र तरीही अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. पोलिसांनी अडवले नंतर अनेक जण पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. खरंतर सध्याची परिस्थिती वाद घालण्याची नसून एकमेकाला समजून घेण्याची आहे, असे असताना जे रात्रंदिवस आपल्यासाठी ड्यूटी करत आहेत. त्यांच्याशी हुज्जत घालून अडथळा निर्माण करत आहेत.