शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:16 IST

धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाहीयंत्रणा सुस्त : वनगळ, मालगावचे शेतकरी संकटात

सातारा : धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे तब्बल ७७ लाख २१ हजार ५०० रुपयांचे तर वनगळमधील १५ शेतकऱ्यांचे ५ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. याचा पंचनामा महसूल विभागाने केला होता. त्यानंतर पाटबंधारे विभागाने पंचनामा केला त्यात मालगावातील शेतकऱ्यांचे एकूण ११ लाख २ हजार ७०० रुपये तर वनगळमधील शेतकऱ्यांचे १ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून, आम्हाला मदत कधी मिळणार ? असा सवाल येथील नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत. जिल्हा नियोजन समितीची २९ रोजी बैठक होणार आहे.लोकमत याबाबत वृत्तमालिका प्रसिध्द करुन शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार कार्यालयाने नुकसानीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कुठल्या विभागाने ही मदत करायची, याबाबत महसूल व पाटबंधारे विभाग यांच्यात एकमत पाहायला मिळत नाही.

एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम दोन्ही विभाग करताना दिसत आहेत. कालवा फुटल्यानंतर नुकसान भरपाई देण्याची तरतूद पाटबंधारे विभागाकडे नाही तर ही नैसर्गिक आपत्ती नसल्याने महसूल खातेही निर्णय घेत नाही. या दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीमुळे शेतकरी पेचात सापडले आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर