रिक्षाचालकांची हतबलता स्पष्ट
By Admin | Updated: January 23, 2015 00:42 IST2015-01-22T23:50:06+5:302015-01-23T00:42:09+5:30
बसस्थानक परिसरातून ‘त्यांना’ हटविण्याचे आवाहन

रिक्षाचालकांची हतबलता स्पष्ट
सातारा : बसस्थानक परिसरामध्ये रात्री वारांगणा येत असतात. त्या रस्त्यावर उभ्या राहत असतात. ये-जा करणारे त्यांच्याकडे पाहत असतात. या ठिकाणी येणारी कोण प्रवासी आणि कोण ‘ती’ हे ओळखत असते. हे सर्व प्रकार थांबायचे असतील तर हे ‘उद्योग’ पूर्णपणे थांबले पाहिजेत. असे हतबल होऊन काही रिक्षाचालकांनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
रिक्षा चालक एखाद्या स्टॉपवर रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट पाहत असतात. त्यावेळी एखादी महिला किंवा युवती तेथून जात असल्यास त्या महिलेकडे संशयाने पाहिले जाते. बसस्थानकासारख्या ठिकाणाहून पायी चालताना तर पुरुषी नजरेचा अशा महिलांना त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री रिक्षामध्ये बसण्यासही महिला दजावत नसतात. कारण काही रिक्षा चालक रात्री मद्यपान करून रिक्षा चालवितात. नशेमुळे वाईट प्रसंगही उद्भविण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही महिला रिक्षामध्ये बसत नाही. परंतु सगळेच रिक्षा चालक मद्यपान करून रिक्षा चालवतात असे नाही. काहीजण आपूलकीने वागतात. महिलांविषयी रिक्षा चालकांच्या फारशा तक्रारी येत नाहीत. (प्रतिनिधी)
तर हा वाईट अनुभव येणारच
महिला आणि युवतींची सुरक्षितता बेभरोशे असल्याचे अनेक घटनांतून दिसून आले आहे. रिक्षा चालक रात्री अपरात्री शहरातून प्रवाशी घेऊन फिरत असतात. अशा काही रिक्षाचालकांच्या अनुभवातून बरेच किस्से समोर आले. चुकून एखादी नवखी महिला बसस्थानक परिसराच्या ठिकाणी आपल्या नातेवाईकाची वाट पाहत उभी राहिल्यास त्या महिलेलाही अशा प्रकारचे वाईट अनुभव येऊ शकतात.परंतु रिक्षाचालकांकडून अद्यापही कोणत्याही प्रवाशी महिलेला अशी कधीही वागणूक मिळत नाही.
एक वेळ भाडे कमीजास्त घेण्यावरून प्रवाशांची हुज्जत होत असेल. परंतु महिला अथवा युवतींशी प्रत्येक रिक्षाचालक सभ्यतेनेच वागतात. साताऱ्यामध्ये अजूनही मानुसकी टिकून आहे. मात्र नागरिकांनही रिक्षाचालकांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा.
- सय्यद शेख, गुरूवार पेठ (रिक्षाचालक)
रात्री अपरात्री एखादी महिला आमच्या रिक्षात बसल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या पत्त्यावर सोडत असतो. कोणी न्यायला येणार आहे का, अशी त्यांच्याकडे चौकशीही करतो. वेळ पडल्यास त्यांच्या दारापर्यंत रिक्षा नेतो, अशाप्रकारे आम्ही महिलांची सुरक्षा घेत असतो.
- संजय पवार, (रिक्षाचालक)