शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेला अन् जिवाला मुकला, कुसुरच्या युवकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:12 IST

युवकाचा मृतदेह आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला.

मलकापूर : कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेल्यावर पाय घसल्याने कुसुर येथील युवकाचा बुडुन मृत्यू झाला. कोयना नदीच्या पाण्याला प्रवाह असल्यामुळे युवकाचा मृतदेह आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला. अक्षय हनुमंत पाटील (वय २५, रा. कुसुर ता. कऱ्हाड) असे मृत्यू युवकाचे नाव आहे.दरम्यान संबंधित युवकाला पोहायला येत नव्हते. हातपाय धुवायला गेल्यावर पाय घसरल्याने ही दुर्घटना घडली अशी घटनास्थळावरील व्यक्तींनी सांगितले. ही घटना चचेगाव जुनेगावठाण परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ काल, बुधवारी घडली.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार, अक्षय पाटील हा कऱ्हाड परिसरात कंत्राटदारांकडून मिळालेली ड्रेनेजसह विविध कामे करत होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजता मलकापुरातील काम आटोपून तो कुसुर येथे गावी जाण्यासाठी निघाला होता. जाताजाता मित्राला फोन केला. मित्राचे चचेगाव येथील जुनेगावठाण परिसरात नदिपात्रालगत काम सुरू असल्याचे सांगितले. तो त्याला भेटण्यासाठी चचेगाव येथील कोयना नदीपात्राकडे गेला.नदीपात्रात हातपाय धुवून येतो असे म्हणून तो नदीपात्राकडे गेला. हातपाय धुताना पाय घसरून नदीपात्रात पडला. पोहायला येत नसल्यामुळे पात्रातील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी अक्षय ‘वाचवाऽऽऽ वाचवाऽऽऽ’ म्हणून आरडा ओरडा केला. मात्र मित्र काही अंतरावर त्याच्या कामात मग्न असल्यामुळे व बचावासाठी जवळ कोणीही नसल्यामुळे तो नदीपात्रात बुडाला.ही माहिती मित्राने चचेगाव येथील ग्रामस्थांसह नातेवाईकांना दिली. घटनेची माहिती मिळताच चचेगावचे पोलीस पाटील प्रशांत पवार, ग्रामविकास अधिकारी दिपक दवंडे यांच्यासह कोळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले.काल, बुधवारी उशिरा पर्यंत शोधाशोध केली मात्र मृतदेह सापडला नाही. आज, गुरूवारी सकाळी पुन्हा पोलिसांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले असता  घटनास्थळापासून काही अंतरावर अक्षयचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू