शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गावगुंडाकडून कुमठे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यास मारहाण, बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:27 IST

तू स्वतः डॉक्टर आहेस का ? तुला या गोळीबद्दल काही माहीत आहे का ? असे बोलत त्याने शिपाई नवले यांच्या कानशीलात एक जोराचा फटका दिला. तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत केंद्रात धिंगाणा घातला.

नागठाणे : नागठाणे भागातील कुमठे (ता. सातारा) येथील आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याला गावगुंडाकडून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात संबंधितावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज प्रकाश वाघमारे (वय ३०, रा. कुमठे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुमठे आरोग्य केंद्रामध्ये नागठाणे भागातील ३२ गावे आणि जवळपास ४ उपकेंद्र आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजता डोकेदुखीचे कारण सांगून औषध घेण्यासाठी मनोज वाघमारे दारू पिऊन कुमठे आरोग्य केंद्रात आला. तेथील शिपाई धनंजय नवले यांच्याकडे डोकेदुखीसाठी गोळी मागितली.त्यांनी त्यास डोकेदुखीसाठी एक गोळी दिली असता, तू स्वतः डॉक्टर आहेस का ? तुला या गोळीबद्दल काही माहीत आहे का ? असे बोलत त्याने शिपाई नवले यांच्या कानशीलात एक जोराचा फटका दिला. तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत केंद्रात धिंगाणा घातला. दरवेळी त्याच्याकडून असाच प्रकार होत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचे रात्री - अपरात्री कुमठे आरोग्य केंद्रात येण्यामुळे आरोग्य केंद्रातील महिला कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मनोज वाघमारे याच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी