कुंभारगावला डीपी चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:43 IST2021-05-25T04:43:17+5:302021-05-25T04:43:17+5:30

कळंत्रेवाडी येथील विकास मारुती सावंत यांनी आपल्या धबदबी’ नावाच्या शिवारात महावितरणकडून वीज कनेक्शन घेतले होते. त्यासाठी महावितरणकडून त्यांना डीपी ...

Kumbhargaon is full of DP thieves | कुंभारगावला डीपी चोरट्यांचा धुमाकूळ

कुंभारगावला डीपी चोरट्यांचा धुमाकूळ

कळंत्रेवाडी येथील विकास मारुती सावंत यांनी आपल्या धबदबी’ नावाच्या शिवारात महावितरणकडून वीज कनेक्शन घेतले होते. त्यासाठी महावितरणकडून त्यांना डीपी देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विकास सावंत यांचे बंधू निवास सावंत शेतात गेले असता त्यांना विद्युत खांबावरील डीपी खाली पडलेली दिसली. डीपीचे सर्व नटबोल्ट खोलण्यात आले होते. सर्व ऑइल जमिनीवर पडलेले होते. लायटिंग अरेस्टर, बुशिंग विस्कटलेल्या अवस्थेत होते. चोरट्यांनी डीपी पूर्ण फोडण्याचा प्रयत्न केला होता. शेजारी विहिरीतील मोटारीची केबल कट करून त्यातील तांब्याची तार काढलेली होती.

हा प्रकार निदर्शनास येताच निवास सावंत यांनी वीज कर्मचारी दिलीप घोलप यांना माहिती दिली. वीज कर्मचारी घोलप यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच ढेबेवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. हवालदार घाडगे तपास करीत आहेत.

फोटो : २४केआरडी०७

कॅप्शन : कळंत्रेवाडी, ता. पाटण येथील शिवारात असणारा डीपी उतरवून चोरट्यांनी साहित्य लंपास केले आहे. (छाया : पोपट माने)

Web Title: Kumbhargaon is full of DP thieves