‘कृष्णा’च्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST2021-07-16T04:26:46+5:302021-07-16T04:26:46+5:30

कऱ्हाड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची नुकतीच निवड झाली. या ...

Krishna's new President, Vice President felicitated | ‘कृष्णा’च्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार

‘कृष्णा’च्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार

कऱ्हाड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची नुकतीच निवड झाली. या निवडीबद्दल कऱ्हाड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर व श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

एम. के. कापूरकर म्हणाले, ‘डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत कारखान्याचा कारभार अत्यंत चांगला झाला. ऊसाला चांगला दर मिळण्याबरोबरच त्यांनी कामगारांच्या प्रश्नांकडेही लक्ष दिले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला आहे.’

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी अभूतपूर्व मतदान करून यश दिले. त्याने आपण भारावून गेलो आहे. पण त्याचवेळी आमची जबाबदारी वाढले आहे याची जाणीव झाली आहे. सभासद कामगारांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या पुढचा कारभार निश्‍चितपणे करणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी साखर संघाचे उपाध्यक्ष एस. के .शिंदे, कार्याध्यक्ष श्रीराम राजहंस, जनरल सेक्रेटरी सर्जेराव पाटील, जॉईंट सेक्रेटरी हौसेराव लोकरे, खजिनदार मोहन शेटे, गणेश मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सचिव जितेंद्र साळुंखे, खजिनदार सूर्यकांत फार्णे, यांच्यासह कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वा प्र )

फोटो

शिवनगर (ता. कराड )येथे डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार करताना एम. के. कापूरकर यावेळी जगदीश जगताप, डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: Krishna's new President, Vice President felicitated