शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

कृष्णाच्या निवडणुकीत इंद्रजित मोहितेंच्या पाठीशी ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:09 IST

KrushanSugerFactory Karad Satara  : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत पतंगराव कदम यांचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पूर्णपणे इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. साम-दाम-दंड-भेद सर्वप्रकारे या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या निवडणुकीत सभासदांना हवे असणारे लोक सत्तेमध्ये येतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देकृष्णाच्या निवडणुकीत इंद्रजित मोहितेंच्या पाठीशी ठाममनोमिलनासाठी मनापासून प्रयत्नांची गरज : विश्वजित कदम

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत पतंगराव कदम यांचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पूर्णपणे इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. साम-दाम-दंड-भेद सर्वप्रकारे या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या निवडणुकीत सभासदांना हवे असणारे लोक सत्तेमध्ये येतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना हा दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या विचारांतून उभा राहिला आहे. यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या प्रेमाखातर आणि या दोन्ही कुटुंबाशी असणारे संबंध पाहता डॉ. पतंगराव कदम हे त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या कार्यक्रमाला कराडमध्ये आले होते, अशी आठवण सांगून मंत्री कदम म्हणाले, कृष्णा कारखाना निवडणुकीत पलूस, कडेगाव तालुक्यातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझी यंत्रणा सक्षमपणे राबविणार आहे. हा कारखाना इंद्रजित मोहिते यांच्या ताब्यात देण्यासाठी जे काय लागेल, ते करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांचे मनोमिलनबाबत बोलताना ते म्हणाले, मनोमिलन होण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची गरज आहे. एकतर्फी किंवा लादून एकत्र येण्यात कसलाही अर्थ राहणार नाही. कारखान्यातील सभासदांच्या हितासाठी कराड आणि वाळवा तालुक्‍यातील सर्व नेत्यांना मी व्यक्तिशः भेटलो आहे आणि भेटणार आहे. निवडणूक दुरंगी किंवा तिरंगी कशीही होओ, मी इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे असणार आहे. कारखान्यात चांगल्या विचारांचे लोक सत्तेत यावेत, यासाठी माझा प्रयत्न राहील.चौकटकोरोनाच्या कालावधीत राज्यातील सर्व पत्रकार स्वतःचा जीव मुठीत धरून काम करीत आहेत. त्या सर्व पत्रकारांना वयाची अट न घालता कोविड प्रतिबंधक लस देण्याची गरज आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालणार आहे. पत्रकारांचा समावेश फ्रन्टलाइन वारियर म्हणून करावा, असा माझा आग्रह असणार आहे, असे मंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले.चौकटदरम्यान, मंत्री विश्वजित कदम व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली.‌ सदरची चर्चा ही कृष्णा कारखाना निवडणूक संदर्भात झाली, पण त्याचा तपशील समजू शकला नाही.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमKaradकराडSatara areaसातारा परिसरSangliसांगली