‘कृष्णा’च्या १३० हरकती फेटाळल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:27+5:302021-05-05T05:03:27+5:30
कऱ्हाड : ‘रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. ...

‘कृष्णा’च्या १३० हरकती फेटाळल्या!
कऱ्हाड : ‘रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. त्यावर हरकती घेण्याची दि. २२ रोजी अंतिम मुदत होती. १५८ हरकती यावेळी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १३० हरकती फेटाळण्यात आल्या आहेत, तर २८ हरकती मंजूर केल्या आहेत,’ अशी माहिती पुणे साखर संघाचे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिली.
डोईफोडे म्हणाले, ‘आमच्या कार्यालयाकडे सुमारे १५८ हरकती आल्या होत्या. त्यामध्ये आमचे मतदार यादीमध्ये नावच नाही; जमीन नावावर नाही तरी हे सभासद कसे झाले आहेत, चुकून मयत म्हणून दाखवले गेले आहे, अशा प्रकारच्या हरकती होत्या. त्याबरोबर दोन संस्थांच्या ठरावाच्या नावात अदलाबदल झाली होती त्याबाबतची एक हरकत होती. यावर सुनावणी झाली होती. त्याचा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, ६ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.’