शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : कृष्णामाईने टाकली कात; वाई पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, भिंती देतायत स्वच्छतेची साद, कृष्णा नदीचे रुपडे पालटले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:18 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत वाई पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात असताना आता पालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या श्रमदानातून ऐतिहासिक कृष्णा घाटाने मोकळा श्वास घेतला आहे.

ठळक मुद्देकृष्णा नदीचे रुपडे पालटले...कृष्णामाईने टाकली कात वाई पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीमभिंती देतायत स्वच्छतेची साद

वाई : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत वाई पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात असताना आता पालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या श्रमदानातून ऐतिहासिक कृष्णा घाटाने मोकळा श्वास घेतला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाने राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये स्वच्छ सुंदर शहर या स्पर्धेस प्रारंभ केला आहे. या स्पर्धेत नगरपालिकांनी सुध्दा मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे़. वाई पालिका प्रशासनाने सर्व पातळ्यांवर कामांचा धडाका लावला असून स्वच्छतेमुळे वाई शहराचे रूपडे पालटताना दिसत आहे़.

वाई शहराच्या मध्यातून कृष्णा नदी जाते़ ऐतिहासिक, सांकृतिक महत्व असणारी कृष्णा नदी ही वाईची आस्मीता म्हणून ओळखली जाते. सहाजिकच नदी स्वच्छता केल्याशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही़ या जाणीवेतून वाई येथील कृष्णा सेवाकार्य समिती, नगरपालिका, व्यवसायिक, नोकरदार व पर्यावरण प्रेमींनी आठवड्यातील  एक दिवस कृष्णेसाठी हा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून हाती घेतला असून याचे फलीत म्हणून संपूर्ण घाट स्वच्छ सुंदर होऊ लागला आहे.

या चळवळीस दिवसेंदिवस लोकसहभाग वाढत असून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होताना दिसत आहे़ शहरातील भिंतीनाही आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, या भिंतीही आता स्वच्छते बाबत प्रबोधन करू लागल्या आहेत.कृष्णा नदीचे रुपडे पालटले...कृष्णामाई सेवा कार्य समितीच्या पुढाकाराने आठवड्यातील प्रत्येक रविवारी वाईकरांच्या सहकार्याने घाटावर स्वच्छता अभियान राबविले जाते. गेल्या तीन महिन्यात कृष्णा नदीची मोठ्या प्रमाणात स्वच्छता झाल्याने नदीचे रूपडे पालटले असून स्वच्छ सुंदर कृष्णामाई कायम रहावी, अशी आपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान