स्वच्छ सर्वेक्षण : महापौरांसह पदाधिकाºयांना ठिकठिकाणी अव्यवस्थेचे दर्शन प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:36 AM2018-01-06T01:36:24+5:302018-01-06T01:36:59+5:30

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरुवात झालेली असताना महापौरांसह पदाधिकाºयांना पाहणी दौºयात ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे.

Clean Surveys: The office bearers, including the mayor, are at loggerheads on the efficiency of Darshan administration. | स्वच्छ सर्वेक्षण : महापौरांसह पदाधिकाºयांना ठिकठिकाणी अव्यवस्थेचे दर्शन प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

स्वच्छ सर्वेक्षण : महापौरांसह पदाधिकाºयांना ठिकठिकाणी अव्यवस्थेचे दर्शन प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाचा दावा फोलशहरात ठिकठिकाणी पाहणी दौरे

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरुवात झालेली असताना महापौरांसह पदाधिकाºयांना पाहणी दौºयात ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरत असून, गेल्या चार-सहा महिन्यांपासून होत असलेल्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षी नाशिक १५१व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक महापालिकेचे कान उपटले होते. यावर्षी नाशिकची कामगिरी उंचावण्याचेही त्यांनी आदेशित केलेले आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून विविध गुणांकनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणाला प्रत्यक्ष गुरुवार (दि.४) पासून सुरुवात झाली असून, केंद्रीय समितीचे पथक शहरातील स्वच्छतेच्या कामकाजाची कधीही-केव्हाही पाहणी करण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन पथकाच्या प्रतीक्षेत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून महापौरांसह पदाधिकाºयांनी शहरात ठिकठिकाणी पाहणी दौरे सुरू केले आहेत. मात्र, या दौºयात महापौरांसह पदाधिकाºयांना प्रशासनाच्या कामकाजाचा फोलपणा निदर्शनास येत आहे. ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन
घडत आहे.
आताच कसे सुचले?
स्वच्छ सर्वेक्षणाचा पेपर सुरू झाला असताना महापौरांसह पदाधिकाºयांच्या पाहणी दौºयात स्वच्छतेच्या कामाचे वाभाडे निघत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणासाठीची तयारी गेल्या चार-सहा महिन्यांपासून सुरू असताना त्याचवेळी महापौरांसह पदाधिकाºयांनी स्वच्छतेच्या कामांबाबत असलेला कळवळा दाखविला असता तर कदाचित आजच्या घडीला अव्यवस्थेचे दर्शन घडले नसते. आता वधुसंशोधनासाठी वराकडील मंडळी येऊ घातली असताना आपल्याच मुलीविषयीचे दोष त्यांच्यासमोर उघडे करून मुलीला नाकारण्यास भाग पाडण्याचा हा प्रकार चर्चेचा आणि मनोरंजनपर ठरत आहे.

Web Title: Clean Surveys: The office bearers, including the mayor, are at loggerheads on the efficiency of Darshan administration.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.