महसूल कर भरण्यात ‘कृष्णा’ आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST2021-03-07T04:35:30+5:302021-03-07T04:35:30+5:30
शासनाची तिजोरी मजबूत करण्यामध्ये करांचा वाटा मोठा असतो. विविध संस्थांच्या आणि व्यवसायांच्या माध्यमातून शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम कररूपाने गोळा ...

महसूल कर भरण्यात ‘कृष्णा’ आघाडीवर
शासनाची तिजोरी मजबूत करण्यामध्ये करांचा वाटा मोठा असतो. विविध संस्थांच्या आणि व्यवसायांच्या माध्यमातून शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम कररूपाने गोळा होत असते. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आर्थिक वर्षात सर्वच संस्थांना मोठ्या आर्थिक अडचणींतून वाटचाल करावी लागली. मात्र, अशा परिस्थितीतही कृष्णा कारखान्याने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत सहकार व उद्योग क्षेत्रात स्वत:ची छाप पाडली आहे.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने शासनाकडे व्हॅट करापोटी ७७ कोटी १६ लाख रुपये आणि जीएसटीपोटी ९ कोटी ५ लाख असा एकूण ८६ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. जिल्ह्यात इतक्या मोठ्या रकमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरला असून, याबद्दल वस्तू व सेवा कर विभागाने कृष्णा कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे.