कृष्णा बँकेची शेड्युल्ड बँकेच्या दिशेने वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:29+5:302021-03-20T04:39:29+5:30
कऱ्हाड : कोरोनानंतर आर्थिक संकटातही कृष्णा बँकेने जनतेला आर्थिक दिलासा दिला. येत्या काळात कृष्णा बँक ही शेड्युल्ड बँक म्हणून ...

कृष्णा बँकेची शेड्युल्ड बँकेच्या दिशेने वाटचाल
कऱ्हाड : कोरोनानंतर आर्थिक संकटातही कृष्णा बँकेने जनतेला आर्थिक दिलासा दिला. येत्या काळात कृष्णा बँक ही शेड्युल्ड बँक म्हणून आपली सेवा देणार आहे, त्यादृष्टीने बँकेची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केले.
बँकेची ४९वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाली त्यावेळी अतुल भोसले बोलत होते. यावेळी बँकेचे मार्गदर्शक कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेपुढील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. कापसे यांनी सभेच्या नोटिसीचे वाचन केले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना बँकेचा उपयोग व्हावा हा दिवंगत जयवंतराव भोसले यांचा विचार होता. कृष्णा बँक अनेक निकषांमध्ये पात्र ठरली आहे. म्हणूनच सहकारी बँकेमध्ये कृष्णा बँक अग्रेसर ठरली आहे. रिझर्व्ह बँकेनेही कृष्णा बँकेला नावाजलेले आहे.’
यावेळी उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, महादेव पवार, प्रमोद पाटील, ॲड. विजयकुमार पाटील, बाळासोा पवार, नामदेव कदम, व्यवस्थापक गणपती वाटेगावकर, भगवान जाधव उपस्थित होते. (वा.प्र.)
फोटो ओळी :
कराड येथे कृष्णा सहकारी बँकेच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष डॉ. अतुल भोसले. बाजूस संचालक मंडळ.