शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित नाही, तर...; भारत पाटणकरांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 14:53 IST

मंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलनाला भेट देऊन महिनाभरात बैठकीचे पत्र देताना आंदोलन मागे घेण्याबाबत आवाहन केले होते

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्तांनी गेली तीस दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे न घेता एक महिनाभर सुटी घेण्याचा निर्णय उपस्थित आंदोलकांनी हात वर करून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न झाल्यास पुन्हा राज्यभर आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर यांनी दिला आहे. कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर २७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनात ते बोलत होते.कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला तीस दिवसांत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. मात्र २४ मार्चरोजी मंत्रालयात आयोजित केलेल्या प्रधान सचिव यांच्यासोबतच्या बैठकीत अनेक प्रश्नांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर ही बैठक प्रकल्पग्रस्तांसाठी महत्त्वाची ठरली. या बैठकीतील अनेक निर्णयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.सोमवारी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलनाला भेट देऊन महिनाभरात बैठकीचे पत्र देताना आंदोलन मागे घेण्याबाबत आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी थोडासा बदल करत आंदोलन मागे न घेता एक महिनाभर आंदोलनाला सुटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.डाॅ. पाटणकर म्हणाले, ‘सात लाख ३१२ प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रात आहेत. त्यांना उद्ध्वस्त करणारे कब्जे हक्कांची किंमत व मिळालेल्या जमिनीवर व्याज वसुलीचे शासन निर्णय होते. या दोन शासन निर्णय दुरूस्ती, इतर प्रकल्पांप्रमाणे कोयनेला नियोजन आराखडा, घर बांधणी अनुदान पात्र खातेदार, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे, तारळी प्रकल्पग्रस्तांच्या घराशेजारील गायरान व महसूल पड जमिनी देणे आदी निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत होणार आहेत. यामुळे आंदोलनाला न आलेल्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे.यावेळी दिलीप पाटील, शरद जांभळे, श्रीपती माने यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संतोष गोटल, सचिन कदम, महेश शेलार, सीताराम पवार, बळीराम कदम, दाजी पाटील, परशुराम शिर्के, प्रवीण साळुंखे, अनिल देवरूखकर, राजाराम जाधव, आकाश कांबळे यांच्यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चर्चा करून काढला मध्यआंदोलन सुरू की स्थगित करायचा याचा मध्य साधत निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून २७ एप्रिलपर्यंत आंदोलनाला सुटी आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न झाल्यास सात लाख प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रभर आंदोलन करतील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींबाबत मार्गदर्शनआंदोलनाला सुटी असली तरी, प्रकल्पग्रस्त महिनाभर कोयना (पाटण), जामगाव (सातारा), कामथी (खटाव), वांग (कडेगाव), बामणोली, शिरोळ, हातकणंगले आदी ठिकाणी एकत्र येऊन आजवर झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी व प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर