शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा; कोयना, महाबळेश्वरला गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 12:11 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षीचा दुष्काळ पुसून काढत वरुणराजाने यंदा जोरदार बरसात केली. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत कोयनानगर येथे गतवर्षीच्या ...

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षीचा दुष्काळ पुसून काढत वरुणराजाने यंदा जोरदार बरसात केली. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत कोयनानगर येथे गतवर्षीच्या तुलनेत १ हजार ४३४, तर नवजालाही १ हजार ४ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. तसेच महाबळेश्वरमध्येही मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक पर्जन्यमान आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी होते. पश्चिम भागातील प्रमुख आणि मोठे पाणी प्रकल्पही भरले नव्हते. कोयनेसारख्या १०५ टीएमसीच्या धरणातही जेमतेम पाणीसाठा झालेला आहे. ९५ टक्क्यांपर्यंतच धरण भरलेले. तर इतर धरणेही पूर्ण भरलेली नव्हती. परंतु, यावर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा झाली आहे.मागीलवर्षी २४ सप्टेंबरपर्यंत कोयनेला ३ हजार ९१४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली. पण, यंदा आतापर्यंत ५ हजार ३४८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. नवजालाही गतवर्षी ५ हजार ५३५ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी आतापर्यंत तब्बल ६ हजार ५३८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. महाबळेश्वरलाही गतवर्षीपेक्षा ८८२ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. आतापर्यंत ६ हजार २०४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर कोयना धरणातही अधिक पाणीसाठा आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीपेक्षा सुमारे ११ टीएमसी साठा अधिक आहे. यावर्षी ४ सप्टेंबरलाच कोयना धरण पूर्ण भरले होते.

पश्चिम भागात पावसाची उघडझाप..जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगलाच पाऊस होऊ लागला आहे. पण, पश्चिमेकडे उघडझाप आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर आणि नवजाला अवघा एक तर महाबळेश्वरमध्ये ४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले होते. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक बंद झाली आहे. तर धरणातील विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRainपाऊस