शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

‘कोयना’च्या अभियंत्यांना पावसाने चकविले !

By admin | Published: September 19, 2016 10:58 PM

नियोजन फसले : पाणी सोडल्याने ऊस शेती पाण्यात; कृषिपंप गेले वाहून...

पाटण : कोयना नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची ऊस शेती पाण्यात तर कृषिपंपाच्या मोटारींही वाहून गेल्या. एवढेच काय नदीकाठी केलेल्या अंत्यसंस्कारानंतर सारेच वाहून गेल्याने रक्षाविसर्जनासाठीही रक्षा उरली नाही. हे सारे कोयना धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करून ठेवण्याच्या उद्दीष्टामुळेच ही वेळ आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. धरण ८० टक्केच भरले आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे हे धरण अगदी काठोकाठ भरून ठेवायचे ठरले. यंदा केवळ चांगलाच पाऊस झाला नसून आतापर्यंत पाच हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्यंतरी ६ आॅगस्ट रोजी पावसाच्या भीतीने ७ आॅगस्ट रोजी कोयना धरण व्यवस्थापनच्या अभियंत्यांना धरणात ८७ टीएमसी पाणी असताना धरणाचे दरवाजे दोन फुटाने उचलून पाणी सोडावे लागले. कारण भविष्यात पावसाचा जोर वाढला तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित राहावा. नदीकाठच्या गावांना पुराचा तडाका बसू नये, हीच भावना होती. मात्र पाणी सोडले आणि पाऊस थांबला. त्यामुळे लगेच कोयनेची दारे बंद करावी लागली. त्यानंतर धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा होईपर्यंत महिनाभराची वाट पाहावी लागली. त्यासाठी पायथा किंवा धरणाच्या दरवाजाद्वारे पाण्याचा एकही थेंबही जाऊ दिला नाही. अखेर कोयना धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले. पायथ्यातून वीजनिर्मिती करून पाण्याचा विसर्ग २,१११ क्युसेक करण्यास सुरुवात केली. अनंत चतुर्थीनंतर परतीच्या पावसाचा जोर वाढला. मग आता काय करायचे? धरण तुडुंब भरलेले होते आणि वरून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षणीय वाढली. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे चार फुटांनी उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला. त्यानंतर २४ तासांत दरवाजे सहा फुटांवर नेऊन तब्बल ५४,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविला. (प्रतिनिधी)शेती गेली पाण्याखालीएवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे कोयना धरणापासून कऱ्हाडपर्यंतच्या नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. संगमनगर धक्का जुना पूल, मूळगाव पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे अनेक गावे व ग्रामस्थांचा संपर्क तुटला. कृष्णा नदीलाही पुराचे स्वरूप आल्याने सांगलीकडील गावेही पूरसदृश्य झाली.कोयना धरण परिसरात अचानक तीनशे मिलिमीटर पाऊस झाला. त्याअगोदर धरणातून पाणी सोडणे योग्य नव्हते. कारण जर पाऊस झाला नसता तर धरण रिकामे करून चालणार नव्हते. तरीही आपण चार टप्प्यांत धरणातून पाण्याचा विसर्ग केला. एवढ्या प्रमाणात पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात आली होती.- ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन